IPL 2021 Postpone : विकेटकीपर ऋद्धिमान साहाने सांगितल्या कोव्हिड काळातील 'यातना'

मला सरावा दरम्यान थकल्यासारखं वाटत होतं. दोन वेळा माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. तिसऱ्यावेळी मात्र...

Updated: May 13, 2021, 12:26 PM IST
IPL 2021 Postpone : विकेटकीपर ऋद्धिमान साहाने सांगितल्या कोव्हिड काळातील 'यातना'

मुंबई: बायो बबलमध्ये कोरोना घुसल्यामुळे IPL 2021 सामने तातडीने स्थगित करण्यात आले आहेत. ऋद्धिमान साहाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबीय देखील खूप जास्त घाबरले होते. ऋद्धिमान साहावर नेमकी काय त्यावेळी परिस्थिती आली होती हे त्याने सांगितलं आहे. 

ऋद्धिमान साहाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह 

IPL दरम्यान बायो बबलमध्ये कोरोनानं शिरकाव केल्यानंतर कोलकाता संघाचे 2 खेळाडू पॉझिटिव्ह आले. त्यानंतर ऋद्धिमान साहाचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. त्यामुळे IPLचे उर्वरित सामने स्थगित करण्यात आले. ऋद्धिमानला आधीच लक्षणं असल्यासारखं वाटत होतं. तिसऱ्या कोरोना चाचणी दरम्यान त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

साहाला कोरोना झाल्यानंतर कुटुंबियांचं वाढलं टेन्शन

'रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला खूप भीती वाटली. या विषाणूमुळे संपूर्ण पृथ्वी थांबली आहे. त्याचा संसर्ग झाल्यानंतर माझं टेन्शन आणखी वाढलं. घरातील सर्व सदस्य मला काळजीत होते. व्हिडीओ कॉलद्वारे आम्ही त्यांना खात्री दिली की यात काळजी करण्यासारखं काही मोठं नाही. माझी चांगली काळजी घेतली जात आहे. 

ऋद्धिमाननं सांगितल्या त्या यातना

नेट पॅक्टीसनंतर ऋद्धिमानला खूप जास्त थकवा आल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर ताप आणि खोकला देखील आला. टीमने यासंदर्भात तातडीनं डॉक्टरांना माहिती दिली आणि मला आयसोलेट केलं. त्यानंतर माझी कोरोना चाचणी करण्यात आली. पहिल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. दुसऱ्यांदा चाचणी केल्यानंतरही रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र मला रूम सोडून बाहेर येण्याची बंदी होती. त्यानंतर तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

ऋद्धिमान साहाला टीम इंडियाकडून इंग्लंड दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. तो पूर्ण रिकव्हक झाल्यानंतर संघासोबत सराव करू शकणार आहे. त्याला पुन्हा एकदा कसोटी फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी देण्यात आली आहे.