आयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर

आयपीएलच्या अकराव्या मोसमामध्ये पंजाबची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Updated: Apr 23, 2018, 09:27 PM IST
आयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर  title=

मोहाली : आयपीएलच्या अकराव्या मोसमामध्ये पंजाबची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या ५ मॅचपैकी पंजाबनं ४ मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे पंजाबच्या खात्यात ८ पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नईनंही ५ पैकी ४च मॅच जिंकल्या आहेत. पण नेट रन रेट चांगला असल्यामुळे चेन्नईची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. पंजाबचे ओपनर लोकेश राहुल आणि क्रिस गेल हे सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. गेलनं तर ३ मॅचमध्ये १ शतक आणि २ अर्धशतकं केली आहेत.

प्रिती झिंटाची खास ऑफर

पंजाबच्या या शानदार कामगिरीमुळे टीमची मालकीण प्रिती झिंटा भलतीच खुष झाली आहे. टीमनं यंदाच्या वर्षी आयपीएल जिंकली तर त्यांच्यासाठी मी एक खास गोष्ट करणार आहे, असं प्रिती झिंटा म्हणाली. फायनल जिंकली तरच हे सरप्राईज मिळेल, असं प्रिती झिंटानं सांगितलं. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवल्यावर प्रिती झिंटा लोकेश राहुलशी संवाद साधत होती, तेव्हा तिनं हे वक्तव्य केलं.

२०१४ साली पंजाब फायनलमध्ये

आत्तापर्यंतच्या १० पैकी एकाही आयपीएलमध्ये पंजाबला ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०१४ साली पंजाब फायनमध्ये पोहोचली होती. पण कोलकात्यानं पंजाबला फायनलमध्ये धूळ चारली होती. त्यानंतर मात्र पंजाबचं प्रदर्शन फारसं चांगलं राहिलेलं नाही.