द.आफ्रिका : आजपासून दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत यांच्याच आजपासून पहिली कसोटी खेळली जाणार आहे. सेंच्युरियनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचं प्लेईंग 11 कसं असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश होणार का हा प्रश्न सर्वांना आहे. दरम्यान या दोन फलंदाजांबाबतीत टीमचे कोच राहुल द्रविड यांनी वक्तव्य केलं आहे.
राहुल द्रविड यांनी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेबद्दल सांगितलं की, 'त्यांनाही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीममध्ये संधी मिळेल.' न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेनंतर या दोन्ही फलंदाजांच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
चांगली कामगिरी न करणाऱ्या खेळाडूला काढून टाकणे सोपे आहे का, असा प्रश्न द्रविड यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, 'मला नेहमी वाटतं की, हा दौरा त्यांच्यासाठी देखील मोठी संधी आहे. तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी केली असेल किंवा नसेल केली तरी सर्व खेळाडूंना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी आहे."
"एक फलंदाज म्हणून तुम्हाला कठीण विकेट्सवर नेहमीच चांगली कामगिरी करायची असते, म्हणूनच लोक तुमची आठवण ठेवतात," असंही द्रविड यांनी सांगितलं.
या खेळाडूंच्या सिलेक्शनबाबत प्रतिक्रिया देताना राहुल द्रविड म्हणाले की, "कोणत्याही खेळाडूला बाहेर ठेवणं हे नक्कीच कठीण काम असतं. पण कधी कधी तुम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात. भावनांमध्ये येऊन कोणताही निर्णय घेता येत नाही."
टीम इंडियासोबत पहिल्यांदाच प्रशिक्षक म्हणून परदेश दौऱ्यावर गेलेल्या राहुल द्रविड यांनी सांगितल्याप्रमाणे, टीममधील अंतिम 11 निवडण्यासाठी चर्चा सुरु आहे.