शिमला : टीम इंडियाची खेळाडू मुळची हिमाचलची असणारी क्रिकेटर सुषमा वर्माला राज्य सरकारने डीएसपी बनवण्याची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची ती विकेटकीपर होती.
मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी म्हटलं की, सुषमा वर्माने राज्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं. त्यामुळे राज्य सरकार तिला डीएसपी बनवणार आहे.
या वर्ल्डकपमध्ये तिने पाकिस्तानच्या विरोधातील सामन्यात 33 रनची महत्त्वाची इनिंग खेळली होती. फायनलमध्ये मात्र तिला काही खास कामगिरी करता नव्हती आली. सुषमाचे पिता भोपाल सिंह यांनी राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आभार मानले आहे.