close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

world cup 2019 । दक्षिण आफ्रिका - बांग्लादेश संघ आज भिडणार

विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश संघ एकमेकांना भिडणार आहेत.  

Updated: Jun 2, 2019, 04:55 PM IST
world cup 2019 । दक्षिण आफ्रिका - बांग्लादेश संघ आज भिडणार

लंडन : विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश संघ एकमेकांना भिडणार आहेत. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना रंगणार आहे. सलामीच्या लढतीत फाफ ड्यू प्लेसिसच्या आफ्रिकन संघाला यजमान इंग्लंडकडून १०४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. वर्ल्डकपमधील बांग्लादेश विरुद्धच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

यजमान इंग्लंडविरुद्धच्या आपल्या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पारभव झाला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून वर्ल्डकपमधील आपला पहिला विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

आफ्रिकेला स्पर्धेत पुनरागमन करायचे असल्यास बांग्लादेश संघावर त्यांना विजय मिळवावाच लागेल. तर बांग्लादेश संघ स्पर्धेतील सलामीच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करेल. पण आफ्रिका संघ बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक करणार नाही. बांग्लादेशच्या ताफ्यात प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना रोखण्याची ताकद आहे. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.