World Cup 2019: 'वर्ल्ड कपमध्ये हा भारतीय बॉलर कहर करेल'; ओवेसींची भविष्यवाणी

३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

Updated: May 21, 2019, 09:08 PM IST
World Cup 2019: 'वर्ल्ड कपमध्ये हा भारतीय बॉलर कहर करेल'; ओवेसींची भविष्यवाणी title=

मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. विराटच्या नेतृत्वात खेळणारी भारतीय टीम तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी उद्या रवाना होणार आहे. त्याआधी कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन वर्ल्ड कप जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.

एकीकडे देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी राजकारणावरून लक्ष हटववून वर्ल्ड कपबाबत भविष्यवाणी केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार इंग्लंडमध्ये नागिणीसारखा बॉल हलवून करह करेल, असं ओवेसी म्हणाले.

'सध्याची भारतीय टीम भाग्यशाली आहे, कारण त्यांच्याकडे भुवनेश्वर कुमार, बुमराह आणि मोहम्मद शमीसारखे तीन फास्ट बॉलर आहेत. हे त्रिमूर्ती जगातल्या कोणत्याही बॅटिंगला नेस्तनाबूत करू शकतात. याआधी आपल्याकडे कपिल, श्रीनाथ आणि झहीरसारखे बॉलर होते,' अशी प्रतिक्रिया ओवेसींनी दिली.

'बुमराह आणि शमीसाठी हा मोसम चांगला राहिला. या दोघांनी उत्तम बॉलिंग केली. भुवनेश्वर कुमार ज्यापद्धतीने दोन्ही बाजूंनी बॉल स्विंग करतो, ते अद्भूत आहे. इंग्लंडच्या वातावरणात त्याचा फायदा होईल,' असं मत ओवेसींनी मांडलं. एका इंग्रजी वृत्तपत्रात ओवेसींनी स्तंभ लिहिला.

'आता आपल्याकडे भुवनेश्वर, बुमराह आणि शमीसारखे बॉलर असले, तरी आपण कपिल, श्रीनाथ आणि जहीर यांचं योगदान विसरून चालणार नाही. या तिघांनी अनेक वर्ष भारताच्या फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळली. आता वेळ बदलली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला सुरुवात झाली आहे. नवीन कोचिंग सेंटरही उघडली आहेत. भारतामध्ये फास्ट बॉलर बनणं नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे,' असं ओवेसी म्हणाले.

३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत असली तरी भारताची पहिली मॅच ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

वर्ल्ड कपसाठी भारताची टीम 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), विजय शंकर, रवींद्र जडेजा

वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच

५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

९ जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड

१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान

२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान

२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड

२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश

६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका