World Cup 2019 : 'त्यासाठी आयुष्यभर विलियमसनची माफी मागीन'; स्टोक्स भावूक

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेली वर्ल्ड कपची फायनल इतिहासातली सर्वोत्तम मॅच म्हणावी लागेल.

Updated: Jul 15, 2019, 06:19 PM IST
World Cup 2019 : 'त्यासाठी आयुष्यभर विलियमसनची माफी मागीन'; स्टोक्स भावूक

लंडन : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेली वर्ल्ड कपची फायनल इतिहासातली सर्वोत्तम मॅच म्हणावी लागेल. न्यूझीलंडने दिलेल्या २४२ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २४१ रनच करता आल्या, यामुळे मॅच टाय झाली. यानंतर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने १५ रन केल्या मग पुन्हा बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडलाही १५ रनच करता आल्या. अखेर या मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं.

वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये १५ रनची गरज होती. ट्रेन्ट बोल्टच्या पहिल्या दोन्ही बॉलवर स्टोक्सने रन काढली नाही. यानंतर तिसऱ्या बॉलला स्टोक्सने सिक्स मारली. त्यामुळे इंग्लंडला ३ बॉलमध्ये ९ रनचं आव्हान आलं. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला स्टोक्सने बॉल मिडविकेटच्या दिशेने मारला. दुसरी रन पूर्ण करत असताना गप्टीलने केलेला थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागला आणि बॉल बाऊंड्रीच्या बाहेर गेला. यामुळे अंपायरनी इंग्लंडला ६ रन दिले.

शेवटच्या २ बॉलमध्ये इंग्लंडला ३ रनची गरज होती, पण त्यांना २ रनच करता आल्या. त्यामुळे ही मॅच टाय झाली. सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे सर्वाधिक बाऊंड्रीच्या नियमाप्रमाणे इंग्लंडने वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.

शेवटच्या ओव्हरमध्ये ओव्हर थ्रोमुळे मिळालेल्या ४ रनबद्दल बेन स्टोक्सने न्यूझीलंडची माफी मागितली आहे. 'शेवटच्या ओव्हरमध्ये बॉल माझ्या बॅटला लागून बाऊंड्रीच्या बाहेर गेला. मॅचमध्ये असं होईल, याचा मी कधीच विचारही केला नव्हता. केन विलियमसनची मी याबाबत आयुष्यभर माफी मागीन. मला खरंच असं काही करायचं नव्हतं,' असं स्टोक्स म्हणाला.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x