world cup 2019 : ख्रिस गेलकडून व्हिव्ह रिचर्ड्स यांचा रेकॉर्ड मोडित

हा रेकॉर्ड सर व्हिव्हियन रिचर्डस यांच्या नावे होता.

Updated: Jun 14, 2019, 07:06 PM IST
world cup 2019 : ख्रिस गेलकडून व्हिव्ह रिचर्ड्स यांचा रेकॉर्ड मोडित title=

साऊथम्पटन : वेस्टइंडिज विरुद्ध इंग्लंड सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. वेस्टइंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलने इंग्लंड विरुद्ध 36 धावांची खेळी केली. यादरम्यान गेलने एक रेकॉर्डब्रेक केला आहे.

ख्रिस गेलने 24  रन पूर्ण करताच नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला. गेलने सर व्हिव्हियन रिचर्डस यांचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.

काय आहे रेकॉर्ड

वेस्टइंडिजकडून इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा हा रेकॉर्ड आहे. गेलच्या आधी हा रेकॉर्ड सर व्हिव्हियन रिचर्डस यांच्या नावे होता. त्यांनी 34 इनिंगमध्ये 1619 रन केले होत्या. यात 3 शतक आणि 11 अर्धशतकांचा देखील समावेश होता. त्यांनी 189 रन्सची सर्वाधिक खेळी केली होती.

ख्रिस गेलला त्याच्या खेळीदरम्यान त्याला जीवनदान मिळाले. गेलने केलेल्या 36 रनच्या खेळीत 5 फोर आणि 1 सिक्स लगावला.