World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरने मन जिंकलं, पाहा मैदानात काय केलं?

वर्ल्ड कप २०१९च्या १७ व्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ रननी पराभव केला.

Updated: Jun 13, 2019, 07:27 PM IST
World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरने मन जिंकलं, पाहा मैदानात काय केलं? title=

टॉन्टन : वर्ल्ड कप २०१९च्या १७ व्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ रननी पराभव केला. याचबरोबर ऑस्ट्रेलिया पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी वर्षभराच्या बंदीची शिक्षा भोगलेल्या डेव्हिड वॉर्नरने या मॅचमध्ये शतक झळकावलं. वॉर्नरने १११ बॉलमध्ये १०७ रन केले, यामध्ये ११ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता. वनडे क्रिकेटमध्ये वॉर्नरचे हे १५वं शतक होतं. या कामगिरीबद्दल वॉर्नरला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

मॅन ऑफ द मॅच मिळालेल्या वॉर्नरने मॅच संपल्यानंतर सगळ्यांचीच मनं जिंकली. आपल्याला मिळालेला पुरस्कार वॉर्नरने एका लहान मुलाला दिला. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूकडून मिळालेल्या या गिफ्टमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा हा छोटा चाहता भलताच खुष झाला.

आयसीसीशी बोलताना हा छोटा फॅन म्हणाला, 'मला खूप आनंद झाला आहे. आम्ही फक्त झेंडा फडकवत होतो. तेव्हा वॉर्नर तिकडे आला आणि त्याने मला किताब देऊन टाकला.' आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या फॅनचा व्हिडिओ शेअर केला आहे.

'ऑस्ट्रेलियाकडून परत शतक लगावू का नाही याबाबत माझ्या मनात शंका होती. डिसेंबर २०१७ साली बॉक्सिंग डे टेस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध लगावलेलं शतक माझं शेवटचं शतक ठरलं असतं,' असं वॉर्नर म्हणाला.

'निलंबनाच्या कालावधीमध्ये मी फिट राहण्याचा प्रयत्न करत होतो. ग्रेड क्रिकेट खेळण्याची मजा मी घेतली. त्या कठीण काळात मी स्वत:ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठीच्या स्थितीमध्ये ठेवलं.', अशी प्रतिक्रिया वॉर्नरने दिली.