World Cup 2019 : वर्ल्डकपचा पहिला बॉल खेळण्याआधीच इयन मॉर्गनचा विक्रम

क्रिकेटचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. 

Updated: May 30, 2019, 05:14 PM IST
World Cup 2019 : वर्ल्डकपचा पहिला बॉल खेळण्याआधीच इयन मॉर्गनचा विक्रम title=

लंडन : क्रिकेटचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये यंदाच्या वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळवला जात आहे. या मॅचचा पहिला बॉल पडण्याआधीच इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने विक्रमाला गवसणी घातली आहे. हे रेकॉर्ड करणारा मॉर्गन हा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. इंग्लंडकडून २०० वनडे खेळण्याचा मान मॉर्गनला मिळाला आहे.

इयन मॉर्गन आधी इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगुवडने १९७ वनडे मॅच खेळल्या आहेत. त्या खालोखाल वेगवान बॉलर जेम्स अंडरसनने १९४ वनडे मॅच खेळल्या आहेत. तर तडाखेबाज केवीन पीटरसनने १३४ वनडे खेळल्या आहेत.

मॉर्गनची वनडे कारकिर्द

मॉर्गन हा दोन देशांकडून आंतराराष्ट्रीय सामने खेळला आहे. इंग्लंडकडून खेळण्याआधी मॉर्गनने आयर्लंडचे प्रतिनिधीत्व केले होते.  मॉर्गनने त्याच्या वनडे क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत २२२ वनडे मॅच खेळल्या आहेत. यापैकी २३ मॅचमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर इंग्लंडकडून त्याने याआधी १९९ वनडे मॅच खेळल्या होत्या. आजची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची त्याची २०० वी मॅच आहे.