close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : के.एल. राहुलला आलिया भट्टच्या 'या' खास मैत्रिणीचा पाठिंबा

राहुलसाठीही 'ती' खास असल्याच्या चर्चा आहेत. 

Updated: May 28, 2019, 12:00 PM IST
World Cup 2019 : के.एल. राहुलला आलिया भट्टच्या 'या' खास मैत्रिणीचा पाठिंबा
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : क्रिकेट आणि चित्रपट विश्वाचं नातं हे मुळात शब्दांत व्यक्त  न करता येण्याजोगं. याविषयी किती लिहावं आणि काय बोलावं अशीच अनेकांची अवस्था होते. सेलिब्रिटी जोड्या म्हणू नका किंवा मग इथे घेतल्या जाणाऱ्या मैत्रीच्या आणाभाका म्हणू नका. कला आणि क्रीडा विश्वाचं हे नातं काही औरच. सध्या या दोन्ही क्षेत्रांमध्ये आणि सर्वत्र वेध लागले आहेत, ते म्हणजे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या क्रिकेट विश्वचषकाचे. यातच आणखी एका विषयाने डोकं वर काढलं आहे. अर्थातच या चर्चा आहेत,  एका नव्या जोडीविषयीच्या. 

क्रिकेट आणि चित्रपट वर्तुळात आता लक्ष वेधत आहे ते म्हणजे के.एल. राहुल आणि आकांक्षा रंजन कपूर या दोघांचं नातं. सोशल मीडियावर प्रकाशझोतात असणाऱ्या आणि आलिया भट्टची खास मैत्रीण असणाऱ्या आकांक्षाची राहुलसोबतची मैत्री लक्ष वेधत आहे. अंकित तिवारीसोबत 'तेरे दो नैना' या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकलेली ही सौंदर्यवती राहुलसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देते. जेवणापासून ते चित्रपट पाहायला जाण्यापर्यंत या दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. किंबहुना मुंबईत असतेवेळी राहुलला तिच्यासोबत माऊंट मेरी चर्चमध्येही पाहिलं गेलं. त्यामुळे ही मैत्री जास्तच खास असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Kanch (@akansharanjankapoor) on

राहुलला आणि भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आकांक्षा इंग्लंडला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिचं जाणं अर्थातच राहुलसाठी खास ठरेल. तेव्हा आता खरंच या चर्चा कितपकत प्रत्यक्षरुप घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला भारतीय संघ इंग्लंडमध्ये असून, विश्वचषकासाठी पूर्ण तयारी करत आहे. त्यामुळे पुढील एक- दीड महिना क्रिकेटच्या या रणसंग्रामाला दिवसागणिक रंग चढणार आहे असंच म्हणावं लागेल.