World Cup 2019 | भारत - पाकिस्तान लढत : दोन्ही संघांकडून खेळलेले खेळाडू, पाहा कोण?

 भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान दोन्ही संघातील खेळाडू देशभक्तीनं भारावलेले असतात.  

Updated: Jun 15, 2019, 09:57 PM IST
World Cup 2019 | भारत - पाकिस्तान लढत : दोन्ही संघांकडून खेळलेले खेळाडू, पाहा कोण? title=
संग्रहित छाया

मुंबई : भारत आणि पाकिस्तान लढती दरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंच्या खांद्यावर आपआपल्या देशाची प्रतिष्ठा राखण्याची मोठी जबाबदार असते. भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान दोन्ही संघातील खेळाडू देशभक्तीनं भारावलेले असतात. मात्र तीन खेळाडू असे आहेत की जे भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही संघांकडून खेळले आहेत. ते कोण आहेत हे खेळाडू?

पाक संघाला सबुरीचा सल्ला

दरम्यान, पुलवाला हल्ल्यानन्तर भारत पाकिस्तान प्रथमच आमने सामने उभे ठाकणार आहेत.  या सामान्या दरम्यान दोन्ही देशांच्या भावना तीव्र असतील. अशावेळी जर कणा खेळाडूकडून चूकीची वर्तवणून झाली तर वाद पेटू शकतो. अशी कोणतीही घटना अंगलट येऊ नये म्हणून पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या संघाला सबुरीचा सल्ला दिला आहे.

ICC World Cup 2019: There can be no excuse; we must field well against India, says Sarfaraz Ahmed

Image Credits: Twitter/@TheRealPCB

दोन्ही संघांकडून खेळले खेळाडू

भारत आणि पाकिस्तान मुकाबला म्हणजे जणूकाही क्रिकेटच्या रणभूमीत दोन्ही देशांदरम्यान युद्धच रंगलय अशी परिस्थिती निर्माण होते. आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याशी मुकाबला करताना दोन्ही संघांतील खेळाडूंची छाती गर्वानं जरा अधिकच फुगते. दोन्ही संघातील खेळाडूंच्या भावना या सामन्यात तीव्र असतात. आपल्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या देशवासियांसाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच या इराद्यानंच दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानात उतरतात. असे अनेक खेळाडू आहेत की जे आपल्या देशासाठी प्रतिस्पर्ध्याला मैदानात भिडलेत. मात्र तीन असे आहेत की ज्यांनी भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांच्या क्रिकेट सामन्यात प्रतिनिधीत्व केलंय. तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल कोण असतील बुवा हे तीन क्रिकेटपटू असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तरे ते खेळाडू आहेत.
 
- एमिर ईलाही, गुल मोहम्मद आणि अब्दुल हाफिज कारदार. या तीन खेळाडूंनी भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांची जर्सी परिधान केलीय. 
 
- स्वातंत्र्याच्यापूर्वीच्या संघातून हे तिन्ही खेळाडू भारताकडून खेळले आहेत. १९४७मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यावर हे खेळाडू पाकिस्तानकडून खेळू लागले. 

- एमिर ईलाही यांनी भारताकडून १९४७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळली. तर १९५२ ते १९५३ दरम्यान ते पाकिस्तानकडून खेळले. 

- गुल मोहम्मद यांनी १९४५ ते १९५५ दरम्यान भारताचं प्रतिनिधीत्व केलं. तर १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं. 

- अब्दुल हाफिज कारदार हे १९४६ ते १९४८ दरम्यान भारताकडून खेळले तर १९४८ ते १९५८ दरम्यान पाकिस्तानकडून खेळले. 

World Cup 2019: Pakistan triumph as England fall short in huge run chase

Image Courtesy: Twitter/@WorldCup

गुल मोहम्मद हे फाळणीनंतही १९५५पर्यंत भारताकडून खेळत होते.  पाकिस्तान प्रथमच भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानविरुद्ध त्यांनी भारताकडून प्रतिनिधीत्वही केलं होतं. हे ते तीन खेळाडू आहेत की ज्यांच्या क्रिकेट कारकीर्दीवर इतिहासातील घटनांचा मोठा परिणाम झाला. याचमुळे या खेळाडूंना आपले देशही बदलावे लागले आणि आपल्या अंगावरील जर्सीही बदलावी लागली. मात्र क्रिकेटप्रेमी असेलेलं त्यांचं प्रेम आणि निष्ठा मात्र कायम होती.