close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : अफगाणी बॉलिंगपुढे टीम इंडियाचा संघर्ष, ५० ओव्हरमध्ये २२४ रनपर्यंत मजल

वर्ल्ड कपमध्ये अफगणिस्तानच्या बॉलिंगपुढे टीम इंडियाच्या बॅट्समनचा संघर्ष पाहायला मिळाला.

Updated: Jun 22, 2019, 06:39 PM IST
World Cup 2019 : अफगाणी बॉलिंगपुढे टीम इंडियाचा संघर्ष, ५० ओव्हरमध्ये २२४ रनपर्यंत मजल

साऊथम्पटन : वर्ल्ड कपमध्ये अफगणिस्तानच्या बॉलिंगपुढे टीम इंडियाच्या बॅट्समनचा संघर्ष पाहायला मिळाला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये २२४/८ पर्यंतच मजल मारता आली. अफगणिस्तानच्या स्पिनरनी भारताच्या बॅट्समनच्या नाकी नऊ आणले होते.

पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागला. मुजीब उर रहमानच्या शानदार बॉलवर रोहित बोल्ड झाला. यानंतर केएल राहुल आणि विराटने टीम इंडियाचा डाव सावरायला सुरुवात केली. पण चुकीच्या वेळी खराब शॉट खेळून राहुल माघारी परतला. मोहम्मद नबीच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा राहुलने प्रयत्न केला.

चौथ्या क्रमांकावर आलेल्या विजय शंकरने विराटसोबत पार्टनरशीप केली, पण ४१ बॉलमध्ये २९ रन करून शंकर आऊट झाला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने ६३ बॉलमध्ये सर्वाधिक ६७ रन केले. तर केदार जाधवने ६८ बॉलमध्ये ५२ रनची खेळी केली. धोनीने ५२ बॉलमध्ये २८ रन केले.

अफगणिस्तानकडून कर्णधार गुलबदीन नायब आणि मोहम्मद नबीला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. तर मुजीब, आफ्ताब आलम, राशिद खान आणि रहमत शाह यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.