close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : रोहितचा विक्रम, हे रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने धमाकेदार शतक झळकावलं.

Updated: Jun 16, 2019, 09:24 PM IST
World Cup 2019 : रोहितचा विक्रम, हे रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने धमाकेदार शतक झळकावलं. रोहित शर्माने ११३ बॉलमध्ये १४० रन केले, यामध्ये १४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. रोहितचं वनडे क्रिकेटमधलं हे २४वं शतक होतं. रोहितने ओपनिंगला केएल राहुलसोबत १३६ रनची पार्टनरशीप केली. 

रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध लागोपाठ २ शतकं करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी रोहित शर्माने २३ सप्टेंबर २०१८ ला पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये नाबाद १११ रनची खेळी केली होती. त्या इनिंगमध्ये रोहितने ११९ बॉलचा सामना केला होता. यामध्ये रोहितने ७ फोर आणि ४ सिक्स मारले होते. या मॅचमध्ये भारताचा ९ विकेटने विजय झाला होता. 

याचबरोबर रोहितने वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅचमधला सर्वाधिक स्कोअर बनवण्याचं रेकॉर्डही आपल्या नावावर केलं आहे. याआधी हे रेकॉर्ड कोहलीच्या नावावर होतं. कोहलीने २०१५ वर्ल्ड कपमध्ये एडलेडच्या मैदानात १०७ रन केले होते. तर पाकिस्तानचा खेळाडू सईद अन्वरने २००३ वर्ल्ड कपमध्ये १०१ रनची खेळी केली होती. सचिन तेंडुलकरने याच मॅचमध्ये ९८ रन केले होते. 

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक रन करण्याचं रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या एन्ड्रू सायमंड्सच्या नावावर आहे. सायमंड्सने २००३ वर्ल्ड कपमध्ये नाबाद १४३ रन केले होते.

वर्ल्ड कपमधलं रोहितचं दुसरं शतक

रोहित शर्माचं यंदाच्या वर्ल्ड कपमधलं हे दुसरं शतक आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितने नाबाद १२२ रन केले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितने ५७ रन करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. या वर्ल्ड कपमध्ये दोन शतकं करणारा रोहित हा दुसरा खेळाडू आहे. रोहितशिवाय इंग्लंडच्या जो रुटने यंदा २ शतकं केली आहेत.