लीड्स : भारताविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधली टीम इंडिया आणि श्रीलंकेची ही शेवटची मॅच आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून पहिल्या क्रमांकावर जायची संधी टीम इंडियाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मॅचमध्ये टीम इंडियाने दोन बदल केले आहेत. युझवेंद्र चहलच्याऐवजी कुलदीप यादवला आणि मोहम्मद शमीच्याऐवजी रवींद्र जडेजाला संधी दिली आहे.
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने आधीच प्रवेश केला आहे. तर श्रीलंका स्पर्धेतून बाहेर झाली आहे. सेमी फायनलआधी चांगला सराव म्हणून टीम इंडिया या मॅचकडे पाहत असेल.
श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आणि दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल.
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
दिमित करुणारत्ने, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, लाहिरु थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डिसिल्वा, थिसरा परेरा, इसुरु उडाना, कासुन रजिता, लसिथ मलिंगा