आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'या' खेळाडूचा अलविदा, पत्नीने केले भावनिक ट्विट

आंतरष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून या खेळाडूची निवृत्ती. 

PTI | Updated: Jul 6, 2019, 01:09 PM IST
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'या' खेळाडूचा अलविदा, पत्नीने केले भावनिक ट्विट title=

इस्लामाबाद : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आले आणि शोएबने निवृत्तीची घोषणा केली. ट्विटरद्वारे त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान शोएब मलिक हा भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पती आहे. त्याच्या निवृत्तीनंतर सानियाने भावनिक ट्विट केले आहे. प्रत्येक कथेला शेवट असतो पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते, असे म्हणत शोएबबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. 

९ शतके, ४४ अर्धशतके झळकावली

विश्वचषकातील शोएब मलिकच्या कामगिरीवर विशेषत: भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेल्या कामगिरीवर चांगलीच टीका झाली होती. मलिकने २८७ एकदिवसीय सामन्यात ३४.५५च्या सरासरीने ७ हजार५३४ धावा केल्या आहेत. त्याने ९ शतके आणि ४४ अर्धशतके झळकावली आहेत. तर २८७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५८ विकेट घेतल्या आहेत. त्याने १९ धावांमध्ये ४ विकेट घेतल्या. त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

‪Today I retire from One Day International cricket. Huge Thank you to all the players I have played with, coaches I have trained under, family, friends, media, and sponsors. Most importantly my fans, I love you all‬ ‪#PakistanZindabad ‬

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik) on

 

२००७ ते २००९ या कालावधी शोएब पाकिस्तान संघाचा कर्णधार होता. १९९९ मध्ये  वेस्ट इंडिज विरुद्ध शोएबने एक दिवशीय सामन्याला सुरुवात केली.  तर २००१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या सुरु असलेल्या ( २०१९ ) विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने कसोटी क्रिकेटला २०१५ मध्ये अलिवदा केला होता.  गतवर्षी २०१८ला तो १०० टी-२० सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू होय. 

सानियाचे ट्विट

Proud of your achievements: Sania Mirza's heartfelt post on husband Shoaib Malik's retirement

Image Courtesy: Instagram/@mirzasaniar

प्रत्येक कथेला शेवट असतो. पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते. गेली २० वर्षे अभिमानाने तू तुझ्या देशासाठी खेळल आला आहेस. तू जे काही मिळवलेस आणि आज तू जो कोणी आहेस, त्याबद्दल मला आणि इझहानला तुझा अभिमान आहे, असे सानिया हिने ट्विट केले आहे.