मुंबई : जेव्हा आपल्याला कोणाला सूट किंवा कपडे शिवयाचे असतात तेव्हा आपण टेलरकडे जातो. मात्र जर तुम्ही टीम इंडियाचे सदस्य असाल तर टेलर तुमच्या घरी टेप घेऊन येईल आणि तुमचं मोजमाप घेईल. सध्या सगळे खेळाडू हे आयपीएल खेळत असल्यामुळे देशभरात विखुरलेले आहेत. यातच वर्ल्ड कपही तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खेळाडू आणि स्टाफसाठी नवे सूट-बूट घेण्याची तयारी बीसीसीआयने सुरु केली आहे. यासाठी टेलर चक्क प्रत्येक खेळाडू ज्या कोणत्या शहरात असेल त्या हॉटेलमधील रुमवर जाऊन खेळाडूंची सूटसाठी मोजमाप घेत आहेत. अशाचप्रकारे सपोर्ट स्टाफचंही मोजमाप घेतलं जातं आहे.
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमचा सूट हा निळ्या रंगाचा असून पांढऱ्या रंगाचा शर्ट असेल. दरम्यान यावेळी वर्ल्ड कप असल्यामुळे टीमच्या सूटाचं कापड हे भारतीय ब्रँडचं असणार आहे.
३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. १२ मे रोजी होणारी आयपीएलची फायनल संपल्यानंतर खेळाडू वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला रवाना होतील. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. १४ जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वर्ल्ड कपची फायनल खेळवली जाईल. ९ जुलै आणि ११ जुलैला दोन सेमी फायनल होणार आहेत.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर
५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
९ जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड
१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान
२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड
२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश
६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका