Pakistan vs South Africa, World Cup 2023 : रोमांचक सामन्यात (PAK vs SA) साऊथ अफ्रिकेने पाकिस्तानचा 1 विकेटने पराभव केला आहे. चेन्नईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने 270 करत साऊथ अफ्रिकेसमोर 271 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला यशस्वी पाठलाग करत साऊथ अफ्रिकेने तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. त्यामुळे आता पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) खेळ खल्लास झालाय. अशातच आता पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाला (Team India) देखील मोठा धक्का बसला आहे. नेमका कसा ते पाहुया...
साऊथ अफ्रिकेच्या विजयानंतर भारताचा देखील मोठा धक्का बसलाय. पाईंट्स टेबलमध्ये (Points Table 2023 World Cup) आता साऊथ अफ्रिका पहिल्या स्थानी पोहोचली आहे. सहा सामन्यात 5 विजयासह साऊथ अफ्रिका 10 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर टीम इंडियाकडे देखील 10 गुण आहेत. मात्र, साऊथ अफ्रिकेचा नेट रननेट +2.032 असल्याने साऊथ अफ्रिकेने पुन्हा बाजी मारलीये. तर भारताकडे +1.353 गुण आहेत. पाकिस्तान आणि साऊथ अफ्रिका सामन्यापूर्वी टीम इंडिया नंबर 1 वर होती.
सलग चौथ्या पराभवानंतर पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये (Semifinal qualification scenario) पोहोचण्याचं स्वप्न आता अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सध्या पाईंट्स टेबलमध्ये 6 व्या क्रमांकावर घसरला आहे. 6 सामन्यात 2 विजय अन् 4 पराभव, अशी पाकिस्तानची परिस्थिती. त्यामुळे आता पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचणं जवळजवळ अशक्य झालंय. पाकिस्तानला आता उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. असं झालं तर पाकिस्तानचे 10 अंक होतील. त्यामुळे पाकिस्तानला कमीत कमी चौथी जागा मिळू शकते. यात देखील ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांना उर्वरित चार सामन्यापैकी 2 सामने हरावे लागतील. असं झालं तरच पाकिस्तानचा रस्ता सेमीफायनलकडे जाऊ शकतो, नाहीतर त्यांना बॅगा पॅक कराव्या लागतील.
दरम्यान, बांगलादेशसोबत होणारा 31 ऑक्टोबरचा सामना पाकिस्तानसाठी संजिवनी ठरू शकेल. पाकिस्तानसमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते न्यूझीलंडचं. 4 नोव्हेंबरला होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. तर 11 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी उर्वरित 3 सामने खडतर असतील.