WPL 2024 full schedule : महिला प्रीमियर लीग (WPL) 2024 ची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मागील वर्षीच्या पहिल्या हंगामानंतर आता महिला प्रिमियर लीगच्या (Women's Premier League) दुसऱ्या हंगामासाठी टाईमटेबल जाहीर झालं आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या वेळापत्रकानुसार 23 फेब्रुवारीपासून लीगला सुरूवात होईल. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जाईल तर अंतिम सामना 17 मार्च रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिला सामना डिफेन्डिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सशी (MI vs DC) होणार आहे. त्यामुळे आता अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांव्यतिरिक्त गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे संघ लीगमध्ये सहभागी होणार आहेत. सर्व संघांचे सामने संध्याकाळी सातेसात वाजल्यापासून सुरू होतील. आयपीएलप्रमाणे याचं शेड्यूल असणार नाही. लीगमध्ये प्लेऑफचं गणित थोडं वेगळं असणार आहे.
कसं असेल प्लेऑफचं गणित?
आयपीएलमध्ये टॉप चार संघ प्लेऑफ खेळतात. मात्र, डब्लूपीएलमध्ये टॉप तीन संघ प्लेऑफचे सामने खेळणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असणारा संघ थेट फायनल खेळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेला संघ क्वालियफायर सामना खेळेल. यातील विजयी संघ फायनल खेळेल. 17 मार्च रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
पाहा संपूर्ण वेळापत्रक (WPL 2024 Time Table)
२३ फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
२४ फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. यूपी वॉरियर्स, बंगळुरू
२५ फेब्रुवारी – गुजरात जायंट्स वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
२६ फेब्रुवारी – यूपी वॉरियर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
२७ फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. गुजरात जायंट्स, बंगळुरू
२८ फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स वि. यूपी वॉरियर्स, बंगळुरू
२९ फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
१ मार्च – यूपी वॉरियर्स वि. गुजरात जायंट्स, बंगळुरू
२ मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
३ मार्च – गुजरात जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
४ मार्च – यूपी वॉरियर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, बंगळुरू
५ मार्च – दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
६ मार्च – गुजरात जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
७ मार्च – यूपी वॉरियर्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
८ मार्च – दिल्ली कॅपिटल्स वि. यूपी वॉरियर्स, दिल्ली
९ मार्च – मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स, दिल्ली
१० मार्च – दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
११ मार्च – गुजरात जायंट्स वि. यूपी वॉरियर्स, दिल्ली
१२ मार्च – मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
१३ मार्च – दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात जायंट्स, दिल्ली
१५ मार्च – एलिमिनेटर, दिल्ली
१७ मार्च – फायनल