Kusti Viral Video: कुस्ती परंपरेला गालबोट, माऊली कोकाटेचा राडा; सामन्याच्या अंतिम क्षणी काय घडलं?

Sangali News: दोन्ही पैलवान शेवटपर्यंत तुल्यबळ असल्याने कुस्ती निकाली लागत नव्हती. ही कुस्ती निकाली निघत नसताना माऊली कोकाटे (Mauli Kokate) याच्याकडून इराणच्या हमीद इराणी (Hamid Irani) याला मारहाण झाली.  

Updated: Mar 20, 2023, 11:40 AM IST
Kusti Viral Video: कुस्ती परंपरेला गालबोट, माऊली कोकाटेचा राडा; सामन्याच्या अंतिम क्षणी काय घडलं?
Mauli Kokate,Hamid Irani,Sangli news

Wrestler Mauli Kokate Viral Video: सांगलीतील महापौर चषक कुस्ती स्पर्धेत (Mayor's Cup Wrestling Tournament) माऊली कोकाटेकडून (Wrestler Mauli Kokate) इराणचा पैलवान हमीद इराणीला (Wrestler Hamid Irani) मारहाण केल्याची घटना घडली आहे. जनकौलद्वारे कुस्ती बरोबरीत सोडवली गेली. या सामन्यात कुस्ती परंपरेला गालबोट लागल्याचं पहायला मिळालं. (Wrestler Mauli Kokate beat Iranian wrestler Hamid Irani in the Mayor Cup Wrestling Tournament in Sangli latest marathi news)

सांगलीत (Sangali News) आजपर्यंत अनेक कुस्त्या पार पडल्या आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धा देखील पार पडल्या आहेत. सांगली महापालिका आणि विजयंत मंडळाच्यावतीने दरवर्षी सांगलीत महापौर चषक कुस्ती स्पर्धा भरवली जाते. ही कुस्ती स्पर्धा मनाची मानली जाते. सांगलीत महापौर चषक कुस्ती आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 57 कुस्त्या पार पडल्या.

पहिल्या क्रमांकाची (Kusti Viral Video) कुस्ती पुण्यातील माऊली कोकाटे आणि इराणचा पैलवान हमीद इराणी यांच्यात एक तास वीस मिनिटे चालली. दोन्ही पैलवान शेवटपर्यंत तुल्यबळ असल्याने कुस्ती निकाली लागत नव्हती. ही कुस्ती निकाली निघत नसताना माऊली कोकाटे याच्याकडून इराणच्या हमीद इराणी याला मारहाण झाली.

Sikandar Sheikh: मोहोळमध्ये सिकंदरची जंगी मिरवणूक, म्हणाला "2024 ला महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणारच"

डोक्यावर मारहाण केल्याने उपस्थितांनी याला जोरदार विरोध केला. त्यामुळे कुस्ती बरोबरीत सोडविण्यासाठी उपस्थितांनी देखील जनकौल दिला. शेवटी ही कुस्ती पंच आणि प्रेक्षकांचे मत घेऊन बरोबरीत सोडवण्यात आली.

पाहा Video - 

सांगली महापालिका आणि विजयंत मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेत पुण्याचा माऊली कोकाटे याने इराणचा हमीद इराणी याला कुस्ती अंतिम क्षणी आली असताना डोक्यात मारहाण केल्याने तो जखमी झाला. त्यामुळे उपस्थित असणाऱ्यांचा जनकौल घेऊन दोघांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. कोकाटेच्या या वागणुकीमुळे शौकिना तून संताप व्यक्त होत होता.