आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात 3 मोठ्या निर्णयांना मंजुरी, कोणते नियम बदलले

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून रोजी होणार आहे. या सामन्याआधी ICCने तीन निर्णयांना मंजुरी दिली आहे.

Updated: May 29, 2021, 07:39 PM IST
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात 3 मोठ्या निर्णयांना मंजुरी, कोणते नियम बदलले  title=

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून रोजी होणार आहे. या सामन्याआधी ICCने तीन निर्णयांना मंजुरी दिली आहे. या तीन निर्णयांमुळे मोठा फरक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर यापुढे पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंड सीरिजमध्ये देखील याचा फायदा होणार आहे. 

आयसीसीच्य़ा नव्या नियमानुसार आता मॅच रेफरीला रिझर्व्ह डे संदर्भात निर्णय शेवटच्या दिवसात सामना एक तास संपण्याआधी जाहीर करावा लागणार आहे. याशिवाय आणखी तीन नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. 

एलबीडब्लूचा निर्णय देताना DRS घेण्याआधी बॅट्समॅन किंवा फील्डिंग कॅप्टन अंपायरला विचारू शकतील. त्यामुळे आता आढावा घेणे सोपे होईल. दुसरा निर्णय म्हणजे स्टम्पसंदर्भात घेण्यात आला आहे. एलबीडब्लूचा निर्णय देताना स्टम्पच्या उंची बरोबर बेल्सची उंची देखील पकडली जाणार आहे. 28 इंट विकेट बरोबर अर्धा इंच बेल्सची उंची पण ग्राह्य धरलं जाणार आहे. बॉलचा भाग जर बेल्सच्या 50 टक्क्याहून जास्त वर असेल अंपयार कॉलवर निर्णय दिला जाईल.

आयसीसीने शॉर्ट रनच्या संदर्भात तिसरा बदल केला आहे. शॉर्ट रनचा निर्णय थर्ड अंपायर देणार आहे. थर्ड अंपायर स्वत: रिप्ले बघून तिथल्या तिथे निर्णय देणार आहे. शॉर्ट रन आहे की नाही हा निर्णय पुढचा बॉल टाकण्याआधी थर्ड अंपायर सांगणार आहे.

टीम इंडियामध्ये कोणकोण?

रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकुर, उमेश यादव, के एल राहुल, ऋद्धिमान साहा.