WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (World Test Championship) फायनल सामना बुधवारपासून (7 जून) इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणार आहे, तर पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूतीने भारताचं आव्हान पार करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता सामना कोण जिंकणार? कोण ठरणार टेस्ट क्रिकेटचा बादशाह? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अशातच आता मिस्टर 360 म्हणजे एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याने मोठी भविष्यवाणी केली आहे.
फेव्हरेट कोण हे सांगणं कठीण आहे. दोन्ही संघांनी बर्याच काळापासून कसोटी क्रिकेट खेळलेले नाही पण मी असे म्हणू शकतो की, टीम इंडियाने ओव्हल येथे या अतिशय मजबूत इंग्लंड संघाविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. त्यामुळे पारडं भारताचं जड राहिल, असं MR.360 म्हणतो.
मी फक्त आणखी एका व्यक्तीचा उल्लेख करणार आहे. जो यासारख्या सर्व मालिकांमुळे नेहमीच उत्साही असतो, विशेषतः यूके आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याची कामगिरी खास असते, तो म्हणजे विराट कोहली. विराटला नेहमी खेळताना पाहणं छान पर्वणी असते. विराटला (Virat Kohli) क्रिकेटचा खेळ आवडतो आणि यूकेमध्ये त्याला पुन्हा चांगली कामगिरी करताना पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही, असं म्हणत एबीने आपल्या मित्राचं कौतूक केलंय.
आणखी वाचा - WTC Final 2023: कॅप्टन रोहितचं टेन्शन खल्लास, Sunil Gavaskar यांनी निवडली अशी Playing XI
दरम्यान, जसाजसा सामना जवळ येतोय, तसतसं आता भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? यावर भाकितं वर्तविली जात आहेत. रोहित 5 व्या क्रमांकावर कोणाला संधी देणार? ईशान किशन की केएस भरत? यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर रोहित शर्माच्या रणनितीवर देखील चर्चेवर उधाण आलंय.
Oval Diaries ft. #TeamIndia #WTC23 pic.twitter.com/KM4fL8DgKj
— BCCI (@BCCI) June 6, 2023
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, केएस भरत, रवींद्र जडेजा, इशान किशन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, उमेश यादव.