वर्ल्डकप नाही तर आयपीएल, विराट-रोहित नाही तर 'हा' खेळाडू! 2023 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च... यादी जाहीर

Year Ender 2023 : जूनं वर्ष सरतंय आणि नव्या वर्षाची चाहूल लागलीय. सरत्या वर्षात म्हणजे 2023 मध्ये गुगलने क्रिकेटमध्ये सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या घटनांची यादी जाहीर केली आहे. यात विश्वचषक स्पर्धेपेक्षाही चाहत्यांनी आयपीएलला सर्वाधिक पसंती दिली आहे.

राजीव कासले | Updated: Dec 12, 2023, 05:09 PM IST
वर्ल्डकप नाही तर आयपीएल, विराट-रोहित नाही तर 'हा' खेळाडू! 2023 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च... यादी जाहीर title=

Year Ender 2023: सरतं वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष क्रिकेटसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं. या वर्षात क्रिकेटच्या अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या. क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा समजली जाणारी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा पार पडली. भारताने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुगलने वर्षभरात क्रिकेटमधील सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या घटनांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. 

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं आयोजन चार वर्षातून एकदा केलं जातं. त्यानुसार 2019 नंतर यावर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेची प्रचंड उत्सुकता होती. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. पण गुगलने जाहीर केलेली यादी वाचल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण एकदिवसीय विश्वचषकापेक्षा क्रिकेट चाहत्यांनी 2023 या वर्षात आयपीएल सर्वाधिक सर्च केलं आहे. 

2023 वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेले स्पोर्टस इव्हेंट
1. इंडियन प्रीमियर लीग (IPL)
2. क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup)
3. एशिया कप (Asia Cup)
4. वुमेन्स प्रीमियर लीग (Women's Premier League)
5. एशियन गेम्स (Asian Games)

2023 वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेले खेळाडू
1. शुभमन गिल (Shubman Gill)
2. रचिन रविंद्र (Rachin Ravindra)
3. मोहम्मद शमी (Mohammad Shami)
4. ग्लेन मैक्सवेल (Glenn Maxwell)
5. डेविड बेकहम (David Bekham)
6. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)
7. ट्रैविस हेड (Travis Head)

2023 वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेले क्रिकेट सामने
1. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS)
2. भारत विरुद्ध  न्यूजीलंड (IND vs NZ)
3. भारत विरुद्ध  श्रीलंका (IND vs SL)
4. भारत विरुद्ध  इंग्लंड (IND vs ENG)
5. भारत विरुद्ध  आयर्लंड (IND vs IRE)

2023 वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेले क्रिकेटसंदर्भातले प्रश्न
1. क्रिकेटमध्ये टाईम आऊट म्हणजे काय? (Timed Out Rule in Cricket)
2. आईपीएलमध्ये इन्पॅक्ट खेळाडू म्हणजे काय? (Impact Player in IPL)

गुगल दरवर्षाच्या अखेरीस अशी यादी जाहीर करतं. लोकांच्या आवडी-निवडीनुसार ही यादी जाहीर होते. एकदिवसीय विश्वचषकादरम्यान ग्लेन मॅक्सवेलची डबल सेंच्युरी आणि ट्रेव्हिस हेडची अंतिम फेरीती शतकी खेळीबाबत जाणून घेण्यास लोकांना उत्सुकता होती.