भारताच्या 'या' क्रिकेटरने मोडला गेल, डेविलियर्सचा रेकॉर्ड

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेदरम्यान एका क्रिकेटरने वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडताना जलद शतक बनलेय. 

Updated: Aug 3, 2017, 09:07 AM IST
भारताच्या 'या' क्रिकेटरने मोडला गेल, डेविलियर्सचा रेकॉर्ड  title=
नवी दिल्ली : कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेदरम्यान एका क्रिकेटरने वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडताना जलद शतक बनलेय. 
 
ग्रुप एच्या एका सामन्यात सिटी जिमखानाचा क्रिकेटर प्रोलू रविंद्रने अवघ्या २९ चेंडूत तडाखेबंद शतक ठोकलेय. गेलने आयपीएलमध्ये ३० चेंडूत तर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सने ३१ चेंडूत शतक ठोकले होते. दरम्यान गेल आणि डेविलियर्सचा रेकॉर्ड हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे तर प्रोलूने स्थानिक स्तरावर खेळताना हा  विक्रम केलाय. 
 
गेल आणि डीविलियर्सचा हा रेकॉर्ड प्रोलू रविंद्र या क्रिकेटरने मोडलाय. त्याने ५८ चेंडूत १४४ धावा केल्या. यात १३ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश आहे. त्याने २९ चेंडूत शतकी खेळी साकारली. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर सिटी जिमखानाने ४०३ धावा केल्या.