युवराज सिंगकडून धक्कादायक वक्तव्य, 'धोनीला शेवटपर्यंत साथ मिळाली....'

'धोनीला शेवटपर्यंत साथ....' आजही त्या जखमा ताज्या...युवराज सिंगनं सांगितलं दु:ख

Updated: May 2, 2022, 12:48 PM IST
युवराज सिंगकडून धक्कादायक वक्तव्य, 'धोनीला शेवटपर्यंत साथ मिळाली....' title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि सिक्सर किंग युवराज सिंगने धक्कादायक खुलासे केले. काही चर्चांना पूर्णविराम दिला तर काही गुपितंही सांगितली. 2014 रोजी टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने धीम्या गतीनं खेळी का केली याचंही उत्तर दिलं आहे. 

युवराज सिंगने यावेळी एक दु:ही व्यक्त केलं. प्रत्येक खेळाडूला एक सपोर्ट हवा असतो. सपोर्ट किंवा साथ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो खेळाडू तेवढी चांगली कामगिरी करू शकत नाही. 

2014 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सर्वात स्लो खेळल्याने युवराज सिंगला ट्रोलही करण्यात आलं होतं. त्याने 21 बॉलमध्ये 11 धावा केल्या होत्या. मला त्यावेळी आत्मविश्वासाची कमतरता वाटत होती. तेव्हा अशी वेळ होती की मला टीममधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत होते. 

2014 च्या वर्ल्ड कप दरम्यान मला टीममधून कोणताच सपोर्ट मिळाला नाही. टीममध्ये खूप मोठा बदल आला होता. त्यामुळे आत्मविश्वास कमी पडत होता. मला वाटलं की माझं करिअर संपलं. हे आयुष्य आहे. इथे विजय आणि पराजय दोन्ही स्वीकारावं लागतं. 

महेंद्रसिंह शेवटपर्यंत कसा टिकला? 
महेंद्रसिंह धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअरच्या शेवटपर्यंत खेळत राहिला. यामागे दुसरं तिसरं काही कारण नसून मॅनेजमेंट आणि टीमची साथ ही एकच गोष्ट होती. त्यामुळे धोनी 2019 चा वर्ल्ड कपही खेळू शकला. 

धोनीने 350 वन डे खेळले आहेत. मला असं वाटतं की टीमचा आणि मॅनेजमेंटचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. नाहीतर काहीच शक्य नाही. धोनीला विराट कोहली आणि रवि शास्त्रींचाही सपोर्ट होता. 

सिक्सर किंग पुढे म्हणाला की इथे मीच नाही तर हरभजन सिंह, वीरेंद्र सहवाग, गौतम गंभीर, वीवीएस लक्ष्मण अशा दिग्गज खेळाडूंनाही सपोर्ट मिळाला नाही. 

या खेळाडूंची कामगिरी थोडीही खराब झाली तर टीममधून बाहेर काढण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर होती. अशावेळी त्या खेळाडूकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा कशी केली जाऊ शकते. 2011 नंतर टीम इंडिया आणि मॅनेजमेंटचं संपूर्ण वातावरण बदलल्याचा दावा युवराज सिंगने केला आहे.