युजवेंद्र चहलच्या पत्नीकडून चाहत्यांसाठी खास सरप्राइज, शेअर केला व्हिडीओ

धनश्री वर्मानं चाहत्यांना काय दिलं सरप्राइज, पाहा व्हिडीओ  

Updated: Apr 4, 2021, 09:32 AM IST
युजवेंद्र चहलच्या पत्नीकडून चाहत्यांसाठी खास सरप्राइज, शेअर केला व्हिडीओ title=

मुंबई: टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते. तिने आपल्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राइज दिलं आहे. तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दोघांचंही खूप कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून खूप लाईक्स देखील मिळत आहेत. 

धनश्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय
युजवेंद्र चहलने 2020मध्ये धनश्रीसोबत विवाह केला. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही एकत्र येऊन लग्नाचा निर्णय घेतला होता. धनश्रीने याच लग्नाचा संपूर्ण व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे. 

'आम्ही आपल्यासोबत आमचे सुंदर क्षण शेअर करताना खूप आनंद होत आहे. आम्हाला खरोखर आशा आहे की हा व्हिडीओ आपल्याला नक्की आवडेल आणि आपल्या चेहऱ्यावर सुंदर हसू येईल. लग्न म्हणजे दोन सुंदर जीव एकत्र येत असतात. एकमेकांवर प्रेम करणे आणि एकमेकांना समजून घेणं एवढंच आम्हला म्हणायचं आहे. जीवन खूप सुंदर आहे' असं कॅप्शन देऊन धनश्रीने लग्नाचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे.

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचे युट्यूबवर 15 लाखहून अधिक सब्स्क्राइबर्स आहेत. तिचा स्वत:चा युट्यूब चॅनल आहे. याशिवाय ती हिप-हॉपचं ट्रेनिंगही देते. युजवेंद्र चहल सध्या IPL 2021साठी तयारी करत आहे. 9 एप्रिलपासून IPL सुरू होत आहेत.