'कर्णधार म्हणून Rohit Sharma...'; खराब फॉर्मनंतर झहीर खानची मोठी प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माचा खेळ चांगला होताना दिसत नाहीये. 

Updated: Nov 3, 2022, 08:16 PM IST
'कर्णधार म्हणून Rohit Sharma...'; खराब फॉर्मनंतर झहीर खानची मोठी प्रतिक्रिया  title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली झालीये. दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना सोडला तर तीन सामन्यांमध्ये भारताना विजय नोंदवता आला आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मात्र अशातच टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मवरून टीका केली जातेय. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माचा खेळ चांगला होताना दिसत नाहीये. 

दरम्यान सोशल मीडियावर रोहित शर्मावर टीकास्त्र सोडलं जातंय. अशातच माजी खेळाडू आणि Zaheer Khan ने रोहितला पाठिशी घातलं आहे. 

क्रिकबझसोबत बोलताना झहीर खानने रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. झहीर म्हणतो, कर्णधाराच्या रूपात असताना रोहित शर्माची ओळख ही दबावाच्या परिस्थितीतही शांत राहतो. 

झहीरने रोहितचं कौतुक करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. आयपीएल 2022 दरम्यानही त्याच्या कर्णधारपदावरून झहीरने शर्माची पाठराखण केली होती. तो म्हणाला होता, रोहित प्रत्येक खेळाडूला वेळ देतो आणि प्रत्येकासाठी त्याच्याशी बोलणं खूप सोपं आहे. हा गुण त्यांच्यासाठी आदर्श असतो. रोहितचा अनुभव आणि त्याच्या वृत्तीमुळे आम्ही टीममध्ये अनेक लीडर तयार करू."

रोहित शर्माचा वर्ल्डकपमधील परफॉर्मन्स

T20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आतापर्यंत काही खास कामगिरी करू शकलेला नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. यावेळी त्याने टीमसाठी 39 बॉलमध्ये 53 रन्स केले होते. 

Points Table मधील सध्याची स्थिती काय?

ग्रुप 2 मधील सर्वच संघाचे 4 सामने झाले आहेत. तीन सामन्यातील विजयासह टीम इंडिया (India) 6 गुणांसह सध्या अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानी साऊथ अफ्रिका  (South Africa)) 5 गुणांसह पाय रोऊन उभी आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर असलेला पाकिस्तान (Pakistan) 4 गुणांसह पहिल्या दोन स्थानावर डोळे ठेवून आहे. त्याबरोबर बांग्लादेशचा (Bangladesh) संघ देखील चौथ्या स्थानावर आहे.