झी महाराष्ट्र कुस्ती दंगल : पुणेरी उस्ताद आणि यशवंत सातारा यांची बरोबरी

कसा रंगला सामना

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल : पुणेरी उस्ताद आणि यशवंत सातारा यांची बरोबरी title=

मुंबई : झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा चौथा दिवस सोमवारी अत्यंत अटीतटीच्या डावांसह पार पडला. कुस्तीचा हा महामुकाबला श्री शिव छत्रपती क्रीडापीठ म्हणजेच पुण्याच्या महाळुन्गे-बालेवाडी स्टेडियममध्ये पुढील चौदा दिवस रंगणार असून फक्त आणि फक्त झी टॉकीज वाहिनी व झी५ ऍपवर लाइव्ह बघता येईल. दंगलच्या पहिल्या पर्वाची २ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. चौथ्या दिवशी पुणेरी उस्ताद आणि यशवंत सातारा यांनी ३-३ने पहिल्या सामन्यात बरोबरी केली. आजचा कुस्तीवीर म्हणजेच प्लेयर ऑफ द मॅच यशवंत साताऱ्याची अंशु मलिक ठरली.

सिनेसृष्टीमधून आरोह वेलणकर, पूजा सावंत, संदीप पाठक, पुष्कर लोणारकर, सायली भांडारकवठेकर यांच्या उपस्थितीत चौथा दिवस पार पडला. पूजा आणि सूत्रसंचालक असलेल्या मृण्मयी देशपांडे यांनी साजूक तुपातली या गाण्यावर ठुमकेही लावले. वीर मराठवाडा(संघमालक नागराज मंजुळे), कोल्हापुरी मावळे(सई ताम्हणकर), विदर्भाचे वाघ(संघमालक स्वप्नील जोशी), यशवंत सातारा(संघमालक पुरुषोत्तम जाधव), पुणेरी उस्ताद (संघमालक शांताराम मनवे व परितोष पेंटर) आणि मुंबई अस्त्र(संघमालक प्रणव डाके) असे एकूण सहा संघ झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये खेळत आहेत. प्रत्येक संघ हा कुस्तीचा महासंग्राम रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमांनुसार फ्रीस्टाइल पद्धतीने खेळणार आहे. कुस्तीच्या या महापर्वाअंतर्गत १८ नोव्हेंबरपर्यंत रोज चार संघांमधील दोन सामने असे एकूण बारा डाव रंगणार आहेत.

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या फॉरमॅटमध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला व पुरुष कुस्ती चॅम्पियन्स एकमेकांसोबत भिडताना दिसत आहेत. पुढील चौदा दिवसांतील सर्व सामने श्री शिव छत्रपती क्रीडापीठ म्हणजेच पुण्याच्या महाळुन्गे-बालेवाडी स्टेडियममध्ये रंगणार आहेत. 

पुणेरी उस्ताद विरुद्ध यशवंत सातारा

डाव १ - ६५ वजनगटातील राहुल आवारे विरुद्ध सूरज कोकाटे यांच्यातील लढत अतिशय प्रेक्षणीय ठरली. हे दोघेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. चपळतेसाठी प्रसिद्ध असळवल्या पुणेरी उस्तादच्या राहुलने मोळी आणि भारंदाज डावांचा वापर करत सुरजला १४-०ने हरवले.

डाव २ - ८६ वजनगटातील हनुमंत पुरी विरुद्ध कौतुक डाफळे या दोघांमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली. यशवंत साताऱ्याच्या कौतुकाने १-१०ने हनुमंतवर विजय मिळवला. 

डाव ३- ५५ वजनगटातील विश्रांती पाटील विरुद्ध अंशु मलिक यांच्यात अत्यंत अटीतटीचा डाव रंगला. यशवंत साताऱ्याच्या अंशुने झटपट सलग ६ गुण मिळवत विश्रांतीला चितपट केले.

डाव ४- ७४ वजनगटातील विनोद कुमार आणि अक्षय चोरगे यांच्यात तुल्यबळ अशी लढत रंगली. पुणेरी उस्तादच्या विनोदने सलग १६ गुणांची कमाई करत बाजी मारली.

डाव ५- ५७ वजनगटातील सौरभ पाटील आणि उत्कर्ष काळे यांच्यात रंजक डाव रंगला. दुहेरीपटाच्या मदतीने गुणांची कमाई करत यशवंत साताऱ्याचा कॅप्टन उत्कर्षने सलग ११ गुणांनी विजय मिळवला.

डाव ६- ८६+ वजनगटातील विजय चौधरी आणि १९ वर्षीय आदर्श गुंड यांच्यात जबरदस्त सामना रंगला. ट्रिपल महाराष्ट्र केसरी असलेल्या विजयने आदल्या दिवशी आदर्शला आव्हान दिल्याने सगळ्यांचे लक्ष या डावाकडे लागून होते. दोघांमध्ये टफ फाइट झाली. अखेर या थरारक डावात, अनुभवी अशा विजयने ५-४ने डाव जिंकला.

आता लवकरच कोल्हापुरी मावळे विरुद्ध मुंबई अस्त्र हा दुसरा सामना रंगणार