आरआरपाटील

आबांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध!

निवडणूक आयोगाकडून आबांना दिलासा मिळालाय. गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरलाय.  निवडणूक आयोगानं भाजप उमेदावारानं केलेला अर्ज फेटाळलाय. मात्र अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. 

Sep 29, 2014, 04:32 PM IST

'मोदीच आपल्यामुळे निवडून आले'

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फड जागावाटपानंतर आणखी रंगणार आहे असं दिसतंय, कारण ज्या मतदार संघातील उमेदवारी निश्चित आहे, अशा मतदार संघात निवडणुकीच्या प्रचाराला उधाण आल्याचं दिसतंय. याचे रंग आता सोशल नेटवर्किंगवरही दिसू लागले आहेत.

Sep 18, 2014, 08:50 AM IST

'आबा पोलिस खात्याच्या जीवावर निवडणूक लढवतात'

गृहमंत्री आर आर पाटील यांचं आव्हान, भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी स्वीकारलं आहे. 

Aug 12, 2014, 07:23 PM IST

पुण्यातला स्फोट, बॉम्बस्फोटच! - एटीएसला संशय

पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये झालेला स्फोट बॉम्बस्फोटच असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केलाय. त्यामुळं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पुण्याला लक्ष्य केल्याचं यानिमित्तानं उघड झालंय.

Jul 10, 2014, 06:08 PM IST

विधानसभेच्या तोंडावर सांगलीत राष्ट्रवादीला हादरा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसलाय. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. 

Jul 7, 2014, 10:34 AM IST

विजय कांबळे, अहमद जावेद रूजू न झाल्यास कारवाई?

नियमानुसार सात दिवसांत रूजू न झाल्यास वेगळा विचार करणार, असा इशारा गृहमंत्री आर आर पाटील यांनी विजय कांबळे आणि अहमद जावेद यांना दिलाय.

Feb 17, 2014, 04:44 PM IST

पोलीस आयुक्तपदासाठी मेरीट हाच निकष : आबा

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीबाबत माझ्याजवळ कोणी नाराजी व्यक्त केलेली नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी मेरीट हाच महत्त्वाचा निकष आहे.

Feb 17, 2014, 04:40 PM IST

आबा रेल्वेने, तर भुजबळ हेलिकॉप्टरने मुंबईत

राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा मंत्र्यांनीही मोठा धसका घेतला आहे. आर.आर.पाटील यांना मुंबईहून सांगलीला यायचं होतं, त्यांनी रेल्वेने मुंबई गाठली आहे.

Feb 12, 2014, 10:04 AM IST

रेल्वेविरोधात निष्काळाजीपणाचा गुन्हा दाखल करा : आर.आर.पाटील

रेल्वेविरोधात निष्काळाजीपणाचा गुन्हा दाखल करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले आहेत. मोनिका मोरेचा काही दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघात झाला, अपघातात मोनिकाला आपले दोन्ही हात गमवावे लागले आहेत.

Jan 16, 2014, 04:23 PM IST

बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांचा अमानुष छळ

सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ आणि तासगांव तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांचा अमानुष छळ करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.

Sep 16, 2013, 11:52 AM IST