काँग्रेसच्या युवराजांचे भावनिक आवाहन
काँग्रेसचे महासचिव राहुल यांनी उत्तर प्रदेशाचा कायापालट करुन येत्या पाच वर्षात देशातलं क्रमांक एकच राज्य बनवू असं आश्वासन दिलं. बाराबंकी इथे प्रचंड जनसमुदाया समोर बोलताना राहुल गांधी म्हणाले की मी तुम्हाला खात्री देतो की पाच वर्षात उत्तर प्रदेश उद्योग, व्यावसाय आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत क्रमांक एकच राज्य बनेल.
Nov 22, 2011, 03:18 PM ISTउत्तर प्रदेश विभाजनाचा प्रस्ताव मंजूर
उत्तर प्रदेशचं चार राज्यात विभाजन करण्याचा मायावतींचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव मंजूर होत असतानाच विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. मात्र, तरीही प्रस्ताव मंजूर झाला आहे. आता हा प्रस्ताव पुढे केंद्राकडे पाठवण्यात येईल.
Nov 21, 2011, 08:20 AM ISTराहुल गांधीविरोधात बदनामीची तक्रार
काँगेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात फारुख घोसी यांनी वांदे न्यायदंडाधिकाऱ्यांकडे बदनामीची तक्रार नोंदवली.
Nov 16, 2011, 06:40 AM ISTउत्तर प्रदेशचं विभाजन
उत्तर प्रदेशचं विभाजन करण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटनं मंजुरी दिलीय.
Nov 15, 2011, 08:59 AM IST'महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार'
महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, असा भावनिक सवाल उ. प्रदेशातल्या मतदारांना करत राहुल गांधींनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राहुल यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद मग मुंबईपासून दिल्लीपर्यंत उमटले. राहुल गांधींचं हे वक्तव्य म्हणजे प्रांतवाद नव्हे काय, असा सवाल करत शिवसेनेनंही टीकेची संधी सोडली नाही.
Nov 15, 2011, 07:24 AM ISTसब माया है
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्याचं ठरवलय. लखनौमध्ये ब्राम्हण संमेलन घेऊन त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
Nov 13, 2011, 06:17 PM ISTराहुल गांधी हत्तीला काबूत आणणार का?
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ राहुल गांधी सोमवारी करणार आहेत. बहुजन समाज पार्टीच्या सर्वसर्वा आणि मुख्यमंत्री मायावतींशी वाढत्या संघर्षाची सुरवातच या प्रचार मोहिमेने होणार आहे.
Nov 13, 2011, 05:35 PM ISTऊस शेतकऱ्यांवर 'माये'ची पाखर
महाराष्ट्रात शेतकरी संघटनेने उसाला योग्य दर मिळावा यासाठी तीव्र आंदोलन छेडलं असताना तिकडे उत्तर प्रदेशात मायावती सरकारने उसाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ केली आहे.
Nov 9, 2011, 11:55 AM ISTमायावतीचं काँग्रेसवर शरसंधान
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका समीप येऊ लागल्याने राज्यातलं वातावरण आता तापू लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला आहे. काँग्रेसची नजर दलित मतांवर आहे आणि त्यासाठी ते सुशीलकुमार शिंदेंना पंतप्रधान बनवतील असं विधान मायावतींनी केलं आहे.
Oct 14, 2011, 02:07 PM IST