एटीएस

पुण्यातला स्फोट, बॉम्बस्फोटच! - एटीएसला संशय

पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये झालेला स्फोट बॉम्बस्फोटच असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केलाय. त्यामुळं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पुण्याला लक्ष्य केल्याचं यानिमित्तानं उघड झालंय.

Jul 10, 2014, 06:08 PM IST

मोदींच्या हत्येसाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक

उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.

Mar 27, 2014, 04:57 PM IST

यासिन भटकळ आता महाराष्ट्र एटीएसच्या कस्टडीत

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य यासिन भटकळची महाराष्ट्र एटीएसनं कस्टडी घेतलीये. २८ ऑगस्ट २०१३ला यासिनला इंडो-नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलीस, हैद्राबाद पोलीस आणि आता महाराष्ट्र एटीएसनं यासीन भटकळची कस्टडी घेतलीये.

Feb 6, 2014, 12:19 PM IST

अखेर महिन्याभरानंतर अफजल उस्मानी एटीएसच्या जाळ्यात

इंडियन मुजाहिद्दीनचा फरार दहशतवादी अफजल उस्मानी अखेर एटीएसच्या जाळ्यात सापडलाय. २० सप्टेंबरला उस्मानी मुंबईच्या मोक्का कोर्टातून पळून गेला होता. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, भटकळ बंधूंचा खास साथीदार अफझल उस्मानीला आज पुन्हा जेरबंद करण्यात आलंय.

Oct 28, 2013, 04:26 PM IST

गृहविभागाकडून पोलिसांचं खच्चीकरण!

राज्यात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांचं मनोधैर्य वाढावं यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र मनोधर्य वाढण्याऐवजी त्यांचं खच्चीकरणच होत असल्याचं समोर येतंय. दहशतवाद्यांसोबत प्राणपणानं लढणाऱ्या एटीएस जवानांबाबत राज्याचा गृहविभाग उदासीन आहे

Mar 25, 2013, 05:48 PM IST

बसमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट?

शुक्रवारी रात्री बीडमध्ये झालेला रेडिओ बॉम्बस्फोट चांगलाच शक्तीशाली होती असंच चित्र दिसतंय. बसमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा तर हा कट नव्हता ना? असा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे त्याचदिशेनं सध्या तपास पुढे सरकतोय.

Dec 1, 2012, 11:32 AM IST

बीडमध्ये रेडिओचा स्फोट, एटीएस पथक रवाना

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या काळेगावमध्ये झालेल्या रेडिओच्या स्फोटात 4 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ओम निंबाळकर या एसटी वाहकाच्या घरी हा स्फोट झालाय.

Nov 30, 2012, 10:33 PM IST

दहशतवादाचं जाळं खंडीत... असदच्या भावाचीही झाडाझडती

औरंगाबाद एटीएसने दहशतवादी असदचा भाऊ हुसैन खान याला ताब्यात घेतलयं. त्याच्या मोबाईल कॉलच्या डिटेल्सवरून अधिक माहिती मिळण्यात येणार आहे.

Oct 12, 2012, 02:47 PM IST

पुणे बॉम्बस्फोट : गोव्यात संशयिताला अटक

नुकत्याच झालेल्या पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी गोव्यात एका संशयितला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीचं नाव अफजल खान असं असल्याचं समजतंय.

Sep 8, 2012, 11:59 AM IST

जिंदाल मुंबई पोलिसांच्या तावडीत

२६/११च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार दहशतवादी अबू जिंदाल याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबईच्या क्राईम ब्रँच टीमनं अबूला आज मुंबईच्या किला कोर्टात हजर केलं होतं. ३१ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.

Jul 21, 2012, 04:14 PM IST

'भारतात करायचं होतं ९/११...'

भारतात अमेरिकेतील ९/११ सारखाच दहशतवादी हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तैय्यबानं आखला होता, असा धक्कादायक खुलासा दहशतवादी अबू जिंदालनं केलाय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यानं ही कबुली दिलीय.

Jun 28, 2012, 02:35 PM IST

सरकार झोपी गेलं आहे...एटीएएसकडे अपुरे मनुष्यबळ

महाराष्ट्र एटीएसला मनुष्यबळाचा तीव्र तुटवडा भेडसावत आहे. महाराष्ट्र एटीएसच्या ७३२ जागां पैकी २८३ पद रिक्त आहेत. एटीएसच्या ७३२ कर्मचाऱ्यांच्या मंजूर क्षमते पैकी २८३ पदे रिक्त आहेत म्हणजेच एकूण मनुष्यबळाच्या आवश्यक्तेपेक्षा ३८.६६ टक्के पदे १ सप्टेंबर २०११ रोजी रिकामी आहेत असं एटीएसने एका वृत्त संस्थेला सांगितलं.

Nov 24, 2011, 10:22 AM IST