एफडीआय

ममतांनी काढला केंद्र सरकारचा पाठिंबा

इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले.

Sep 18, 2012, 08:49 PM IST

FDI ला राज ठाकरेंचा पाठिंबा

ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील, मग तो निर्णय कोणत्या पक्षाचा का असेना!
एफडीआय भारतात यायलाच हवं, यासाठी मनसे सरकारला, परदेशी कंपन्यांना पत्र पाठवणार - राज

Sep 18, 2012, 05:28 PM IST

डिझेल,एफडीआय विरोधात सेनेचा मोर्चा

डिझेल दरवाढ आणि एफडीआयला विरोध करत शिवसेनेनं शिवाजी पार्क ते प्रभादेवी असा मोर्चा काढलाय. शिवसेना नेता मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेते आणि शिवसैनिक मोर्चात सहभागी झालेत.

Sep 16, 2012, 11:19 AM IST

`एम फॅक्टर`मुळे सरकार अडचणीत...

यूपीए सरकारसमोर चार ‘एम’ संकट म्हणून उभे ठाकलेत. मायावती, ममता, मुलायम आणि एम. करूणानिधींनी डिझेलची दरवाढ आणि एफडीआयला विरोध केलाय.

Sep 15, 2012, 06:54 PM IST

कोंडी फुटली, संसदेचं कामकाज सुरू

एफडीआयच्या मुद्यावर आज अखेर कोंडी फुटली. त्यामुळं नऊ दिवसांपासून ठप्प असलेलं संसदेचं कामकाज आजपासून सुरू झालं.

Dec 7, 2011, 07:46 AM IST

पवार रिटेलमधील एफडीआयवर ठाम

FDI बील पास झालं तर शेतकरी आणि ग्राहकांचा फायदाच होईल, असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. लोकसभेत विरोधी पक्षांनी एफडीआयवर योग्य चर्चा घडवून आणली, तर यातून लवकर मार्ग निघेल असं पवार म्हणालेत.

Dec 5, 2011, 04:14 PM IST

FDIमुळे बाजार उठणार का?

मॉल्स, सुपरमार्केट्समुळे यापूर्वीच स्थानिक व्यापारांच्या उद्योगांवर परिणाम झाला आहे. पण, ते सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर जाणवलं नाही. पण, यापुढच्या काळात खूप मोठी समस्या निर्माण हऊ शकते. सरकार काही मुद्द्यांचं विश्लेषण करत नाहीये. त्यांचा विचार करायलाच हवा.

Dec 1, 2011, 05:00 PM IST

आज भारत बंद....

रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज भारत बंदचं आवाहन केलं. व्यापाऱ्यांच्या हिताचा नसलेला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारला करण्यात आली.

Dec 1, 2011, 05:52 AM IST

FDI प्रश्नी केंद्रसरकार ठाम

रिटेल क्षेत्रात 51 टक्के थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी स्पष्ट केले. FDI प्रश्नी केंद्रसरकार ठाम असल्याचे त्यांनी आज पुन्हा स्पष्ट केले.

Nov 30, 2011, 04:33 AM IST

'रिटेल'मुळे विरोधक 'नॉट सेटल', संसदेत गोंधळ

संसदेत रिटेलच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं आहे. रिटेलच्या मुद्द्यावर थेट परदेशी गुंतवणूक करण्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

Nov 28, 2011, 06:00 AM IST