Canara Bank Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. कॅनरा बॅंकमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
या भरती अंतर्गत एकूण 6 रिक्त पदे भरली जाणार आहेत. कॅनरा बॅंकमध्ये एमएसजीएस-2 आणि एमएमजीएस-3 ची प्रत्येकी 3 पदे म्हणजेच एकूण 6 रिक्त पदे भरली जाणार आहे.
कॅनरा बॅंक एमएसजीएस-2 रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 ते 30 वर्षांदरम्यान असावे. तसेच उमेदवार आयसीएसआयचा सदस्य असावा. यासोबतच उमेदवाराने एलएलबी, आयसीडब्ल्यूए, सीए याचे शिक्षण घेतलेले असावे. उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असावा. नोकरी मिळालेल्या उमेदवाराला 64 हजार 820 ते 39 हजार 960 रुपयांपर्यंत पगार मिळेल.
एमएमजीएस-3 च्या रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 35 वर्षांदरम्यान असावे. अर्ज करणारा उमेदवार आयसीएसआयचा सदस्य असावा. यासोबतच उमेदवाराने एलएलबी, आयसीडब्ल्यूए, सीए याचे शिक्षण घेतलेले असावे. अर्जदार उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवारांना हिंदी भाषेचे ज्ञान असावे. नोकरी मिळालेल्या उमेदवाराला 85 हजार 920 ते 1 लाख 5 हजार 280 रुपयांपर्यंत पगार मिळेल.
या रिक्त पदांसाठी उमेदवाराची निवड ही ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.
कॅनरा बॅंकमध्ये नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, त्यानंतरच अर्ज करावा. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर पाठवल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्या.