दाभोलकरांच्या हत्येमागे सरकारचाच हात? - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर तोफ डागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रश्नी तपास करण्यास सरकारला अपयश आले आहेत. या हत्याप्रकरणी सरकारबाबत संशय निर्माण होत आहे. त्यांचाच हात नाही ना, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Sep 19, 2013, 12:32 PM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास NIAकडे?- आज सुनावणी
नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना अपयश आलंय. एक महिना होत आला तरी आरोप मोकाट आहेत. त्यामुळं एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेकडे याप्रकरणाचा तपास द्यावा, अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात दाखल केलीये. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Sep 19, 2013, 08:46 AM ISTडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित ताब्यात!
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी जारी केलेल्या दुसऱ्या रेखाचित्राशी मिळता-जुळता चेहरा असलेल्या असिफ नावाच्या एका इसमास शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक- ४ समोरुन ताब्यात घेतलंय.
Sep 5, 2013, 01:11 PM ISTडॉ. दाभोलकर हत्या सीसीटीव्ही फूटेज पाठवणार लंडनला
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणंचं सीसीटीव्ही फूटेज आता अधिक तपासणीसाठी लंडनला पाठवले जाणार आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी साळुंखे यांनी ही माहिती दिलीय.
Aug 30, 2013, 08:40 AM ISTडॉ. दाभोलकर हत्या : `सनातन`चा संशयित ताब्यात
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला पुणे पोलिसांनी गोव्यातून ताब्यात घेतलंय. संदीप शिंदे असं या संशयिताचं नाव असून तो सनातन संस्थेचा साधक आहे.
Aug 28, 2013, 10:19 PM ISTश्याम मानवांचाही आरोप `सनातन`वरच!
सनातन सारख्या संघटनांचा या हत्ये मागे हात असू शकतो असा आरोपही मानव यांनी केलाय सनातन मध्ये वैचारीक लोक नाहीत केवळ रोबो आहेत त्यांच पूर्णपणे ब्रेन वॉशिंग केले आहे त्यांना काहीही सांगितले तर ते करू शकतात
Aug 25, 2013, 11:21 PM ISTदाभोलकर हत्येच्या तपासात प्रगती नाही- मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा दिवस झाले तरीही तपासकार्यात फारशी प्रगती झालेली नाही अशी कबुली स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मात्र हल्लेखोरांचे काही धागेदोरे हाती आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Aug 25, 2013, 10:16 PM IST`जड अंतःकरणा`ने आव्हाडांचं `ढाक्कुमाकुम`!
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर गळा काढणा-या राजकारण्यांनी दोनच दिवसात आपले रंग दाखवायला सुरूवात केली.
Aug 22, 2013, 06:39 PM ISTडॉ. दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट!
डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाही. डॉ.दाभोलकरांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जातोय...
Aug 22, 2013, 06:10 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे RSS चे विचार- ठाकरे
‘आरएसएस’च्या विचारांचा परिपाक म्हणजे नरेंद्र दाभोळकरांची हत्या असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय. आरएसएसने भाजपचा मुखवटा घातला असून गांधींची हत्या करणा-यांना भारतीय जनतेनं दारातही उभं केलं नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
Aug 21, 2013, 08:48 PM ISTमुंबई क्राईम ब्रॅँचकडे तपास, दाभोलकर कुटुंबीयांची तीव्र प्रतिक्रिया
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुंबई क्राईम ब्रॅँचकडून स्वतंत्रपणे तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी क्राईम ब्रँचची एक टीमही पुण्यात दाखल झालीय. मुंबई क्राईम ब्रँचला दाभोलकरांच्या मारेक-याबद्दल काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेत. त्यानुसार हा तपास करण्यात येणार आहे. तर कुटुंबीयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Aug 21, 2013, 02:16 PM ISTउष:काल होता होता काळ रात्र...
पुणं हे नेहमीच पुरोगामी चळवळीचं केंद्र राहिलंय. अनिष्ट रुढी आणि परंपरांविरोधात युद्ध पुकारणारे अनेक मोठे सुमाजसुधारक पुण्यानं दिले. या पुण्यभूमीतच समाजसुधारकांना छळालाही सामोरं जावं लागलं. पुरोगामी दाभोलकरांच्या बाबतीत मात्र प्रतिगामी शक्तींनी अमानुषतेचं टोक गाठलं. दाभोलकरांच्या हत्येमुळं उष:काल होता होता काळ रात्र झाल्याचाच अनुभव महाराष्ट्राला आलाय.
Aug 21, 2013, 11:30 AM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर नावाचं वादळ
अंधश्रद्धा निर्मूलन आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्रात समानार्थी शब्द बनलेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी त्यांनी हयातभर `साधना` केली. पुरोगामित्वाचा वारसा सांगणा-या महाराष्ट्रात त्यांची हत्या व्हावी, यासारखं दुसरं दुर्दैव ते कोणतं..?
Aug 21, 2013, 11:22 AM ISTदाभोलकरांची हत्या सत्तारुढ पक्षाला न शोभणारी गोष्ट - राणे
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही सत्तारुढ पक्षाला न शोभणारी गोष्ट आहे. ही संपूर्ण सरकाराची जबाबदारी आहे, असा घरचा आहेर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलाय.
Aug 21, 2013, 10:01 AM ISTदाभोलकरांवर ‘संगम माहुली’त अंत्यसंस्कार
सातारा जिल्ह्यातील संगम माहुली या मूळगावी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी मुक्ता हिने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
Aug 21, 2013, 09:00 AM IST