www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर तोफ डागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रश्नी तपास करण्यास सरकारला अपयश आले आहेत. या हत्याप्रकरणी सरकारबाबत संशय निर्माण होत आहे. त्यांचाच हात नाही ना, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
अनिंसचे कार्यकर्ते यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी टीका केली. सरकारकडून दाभोलकर हत्या तपासप्रकरणी हालचाली दिसत नाहीत. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या अद्याप तपास का लागला नाही, असा सवालही राज यांनी उपस्थित केलाय. दाभोलकरांच्या हत्येमागे सरकारचाच हात नाही ना?, असा निशाणा राज ठाकरेंनी सरकावर साधला आहे.
दरम्यान, नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना अपयश आले आहे. एक महिना होत आला तरी आरोप मोकाट आहेत. त्यामुळं एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेकडे याप्रकरणाचा तपास द्यावा, अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
राज यांची भेट मुंबईत घेण्याबरोबरच दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर आणि इतर अनिंसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. केंद्र सराकारनेही जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांच्या बरोबर शरद पवार, प्रकाश करात, सीताराम येचूरी, नितीन गडकरी यांचीही प्रतिनिधी मंडळानं भेट घेतली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ