निधन

महान गायक <b><font color=red> मन्ना डे यांना द्या श्रद्धांजली!</font></b>

आपल्या गायन शैलीने रसिकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजविणारे प्रसिद्ध गायक मन्ना डे यांचे आज गुरुवारी सकाळी येथील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांना आपलीही श्रद्धांजली द्या.

Oct 24, 2013, 09:54 AM IST

मन्ना डे यांची गाजलेली गाणी

आपल्या जादुई आवाजाने हिंदी, बंगाली, मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज गाजविणारे मन्ना डे यांचे वयाच्या ९४ वर्षी बंगळूरमध्ये निधन झाले. आजही त्यांची अनेक गाणी हिट झाली आहेत. त्यातील ४० हिट गाणी अनेकांच्या तोंडावर रेंगाळत आहेत.

Oct 24, 2013, 08:02 AM IST

प्रसिद्ध गायक मन्ना डे यांचे निधन

अजरामर संगीताने आणि जादुई आवाजाने भारतीय चित्रपटसृष्टीला अनमोल योगदान देणारे मन्ना डे यांचे बंगळुरू येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

Oct 24, 2013, 07:33 AM IST

ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांचं निधन

ज्येष्ठ नाटककार आणि विचारवंत गोविंद पुरुषोत्तम देशपांडे उर्फ गो.पु. देशपांडे यांचे पुण्यात निधन झालंय. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना जुलैमध्ये ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यानंतर ते कोमात होते.

Oct 16, 2013, 10:30 PM IST

स्वत:ला जाळून घेणाऱ्या आयपीएस अधिकारी सहाय यांचं निधन

अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय यांचं निधन झालंय. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

Oct 3, 2013, 11:08 AM IST

राजीव पाटील यांना अखेरचा निरोप!

दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या पार्थिवावर नाशकात अंत्यत शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीचं रुप पालटवणाऱ्या या अवलियाच्या जाण्यानं आज गोदाकाठही हळहळला. राजीव पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी अवघी मराठी चित्रपटसृष्टी उपस्थित होती. शिवाय नाशिकचे महापौर यतिन वाघ, खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.

Oct 1, 2013, 01:14 PM IST

राजीव पाटील यांच्यावर आज नाशकात अंत्यसंस्कार

आपल्या सगळ्या सिनेमांमधून सामाजिक भान जपणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते तरूण मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचं काल ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्यांच्या नाशिकमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणारेय. त्यांच्या निधनामुळम सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होतेय.

Oct 1, 2013, 08:39 AM IST

ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं आज सकाळी डोंबिवलीत निधन झालं. शंना यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. लेखक, नाटककार अशी त्यांची ओळख होती.

Sep 25, 2013, 08:40 AM IST

‘डॉल्बी’चा आवाज हरपला!

कॉर्डेड आवाजावर नियंत्रण मिळवून हाच आवाज श्रवणीय बनवून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणाऱ्या ‘डॉल्बी’ या ध्वनीमुद्रण प्रणालीचे जन रे डॉल्बी यांचं सॅनफ्रान्सिस्को इथं गुरुवारी निधन झालंय. ते ८८ वर्षाचे होते.

Sep 14, 2013, 02:24 PM IST

माधुरी दीक्षितला पितृशोक

अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिचे वडील शंकर दीक्षित(वय ९१) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यावेळी त्यांचे कुटुंबिय त्यांच्यासोबत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

Sep 13, 2013, 10:49 PM IST

जयंत साळगांवकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकूल वातावरणात पुत्र जयराज साळगावकर यांनी जयंतरावांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साळगांवकरांना श्रद्धांजली वाहिली.

Aug 21, 2013, 09:48 AM IST

‘कालनिर्णयकार` जयंत साळगावकर यांचं निधन

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचं आज पहाटे हिंदुजा रुग्णालयात निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. आज दुपारी तीनच्या सुमारास दादर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Aug 20, 2013, 08:26 AM IST

प्रसिद्ध निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांचं निधन

प्रसिद्ध निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांचं आज पहाटे २.४५ वाजता निधन झालं. नाशिकच्या सोमवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Aug 8, 2013, 09:29 AM IST

संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’ हरपल्या

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी जयमालाबाई शिलेदार यांचं पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. पहाटे 2 च्या दरम्यान पुण्यातल्या पं. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. जयमालाबाईंच्या निधनानं संगीत रंगभूमीच्या ‘शिलेदार’च हरपल्या अशी प्रतिक्रिया संगीत क्षेत्रात व्यक्त होतेय.

Aug 8, 2013, 08:32 AM IST

`नाच गं घुमा`... माधवी देसाई यांचं निधन!

जेष्ठ लेखिका माधवी देसाई यांचे वृद्धापकाळानं बेळगावमध्ये निधन झालंय. त्याचं वय ८० होतं. पहाटे साडेचार वाजता त्यांचं निधन झालं.

Jul 15, 2013, 11:04 AM IST