पद्म’ पुरस्कार

खाशाबा जाधवांचं ऑलिम्पिक पदक समुद्रात फेकू - रंजीत जाधव

भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा पराक्रम करणारे मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तरही ‘पद्म’ पुरस्कार द्यावासा शासनाला वाटत नाही. हा नागरी सन्मान देण्याचा विचारही सरकारच्या मनात येऊ नये यामुळं जाधवांचं पुत्र रंजीत जाधव निराश झाले आहेत. माझ्या पदकवीर वडिलांच्या कामगिरीचा सरकारला विसर पडल्यामुळं त्यांनी जिंकलेलं ऑलिम्पिक पदक अरबी समुद्रात फेकून द्यावं का?, अशा शब्दांत रंजीत जाधव यांनी सरकारप्रती आपला राग व्यक्त केला.

Jan 2, 2014, 09:45 PM IST