पूजा खेडकर

Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा

Pooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे. 

 

Aug 29, 2024, 12:05 PM IST

कोण कुणाची बदनामी करतयं? वादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकरच्या व्हायरल पत्रात गंभीर आरोप

 वादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकर यांचे एक व्हायरल झाले आहे. या पत्रात पूजा खेडकर यांनी पत्रात गंभीर आरोप केले आहे. 

Aug 9, 2024, 04:53 PM IST

अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईत पसार? आणखी एक नवा कारनामा उघड

Pooja Khedkar : दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईत पसार झाल्याचा संशय आहे. या दरम्यान पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकरने नावात 12 वेळा फेरफार केल्याचं उघड झालंय.

Aug 2, 2024, 02:57 PM IST

पूजा खेडकर नक्की आहे तरी कुठे? परदेशात पसार झाल्याच्या चर्चांना उधाण

IAS Puja Khedkar Row: पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर परदेशात फरार झाल्याची माहिती समोर येतंय. 

 

Aug 2, 2024, 10:33 AM IST

पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा; नाव बदलून तब्बल 12 वेळा दिली UPSC परीक्षा

Pooja Khedkar News: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर कारवाई करत यूपीएससीने तीचे ट्रेनी आयएएस पद काढून घेतलं आहे.

Aug 1, 2024, 08:49 AM IST

लाल दिव्याची हौस नडली, फसवणुकीचे 'हे' 5 आरोप... असा झाला पूजा खेडकरचा खेळ खल्लास

Pooja Khedkar Case : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्यावर UPSC ने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. पूजा खेडकर यांचं प्रशिक्षणार्थी पद ताप्तुरतं रद्द करण्यात आलं असून त्यांच्यावर आजीवन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

Jul 31, 2024, 06:04 PM IST

कानात व्हॅक्स, डोळ्यात ड्रॉप्स; दिव्यांग प्रमाणपत्रासाठी उमेदवारांचे चित्र विचित्र प्रताप

 MPSCच्या आदेशानुसार उमेदवारांची फेरपडताळणी होत आहे. यावेळी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी उमेदवारां कडून कानात व्हॅक्स, डोळ्यात ड्रॉप्स अशा अनेक क्लृप्त्या वापरण्यात आल्या. 

Jul 31, 2024, 06:04 PM IST

Breaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारी

UPSC Cancelled Pooja Khedkar Candidature : युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. पूजा खेडकर यांना स्पष्टीकरण देता न आल्याने सिव्हील सर्विस नियमांतर्गत युपीएससीने मोठा निर्णय घेतलाय.

Jul 31, 2024, 03:43 PM IST

'पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर, जिल्हाधिकाऱ्यांनीच तिला रुममध्ये बोलावलं आणि...' प्रकरणात नवा ट्विस्ट

Pooja Khedkar : लैंगिक छळाची तक्रार केल्यानंच आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना टार्गेट करण्यात आला आहे, असा युक्तीवाद पूजा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. तसंच पूजा खेडकर या 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

Jul 31, 2024, 03:37 PM IST

धोंडीबाचं केलं कोंडीबा! पूजा खेडकरच्या कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा, बारामती कनेक्शनसमोर

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक माहिती उघड झाली आहे. खेडकर कुटुंबीयांचा कारनामा उघड झाला आहे.  

 

Jul 30, 2024, 10:09 AM IST

⁠रेणुका ईश्वर करनुरे... पूजा खेडकरनंतर पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा धुमाकूळ

पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. या महिला अधिकाऱ्याने अनेक महिलांची फसवणुक केली आहे. 

Jul 27, 2024, 06:23 PM IST

पूजा खेडकर प्रकरणानंतर लोकसेवा आयोग अ‍ॅक्शन मोडवर, दिव्यांग उमेदवारांची करणार चौकशी

Pooja Khedkar Case : पूजा खेडकर प्रकरणानंतर आता MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जाग आलीय. दिव्यांग उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे.

Jul 26, 2024, 09:44 PM IST

काय आहे UPSC चा दिव्यांग कोटा? IAS पूजा खेडकर प्रकरणानंतर 'हा' मुद्दा चर्चेत

IAS पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर केल्याचा आरोप आहे. पण UPSC चा दिव्यांग कोटा काय आहे? याबाबत अनेकांना माहित नाही. दिव्यांग कोटा म्हणजे काय? हे जाणून घेऊया.

Jul 16, 2024, 04:28 PM IST

पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात, 'या' रुग्णालयाकडून देण्यात आलं दिव्यांग प्रमाणपत्र

Pooja Khedkar : डॉ. पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात गेलाय. त्यांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयानेही या प्रकरणाची प्रकरणाची दखल घेतली आहे. तर चौकशीतून सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया पूजा खेडकर यांनी दिली आहे.

Jul 16, 2024, 03:32 PM IST