'पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर, जिल्हाधिकाऱ्यांनीच तिला रुममध्ये बोलावलं आणि...' प्रकरणात नवा ट्विस्ट

Pooja Khedkar : लैंगिक छळाची तक्रार केल्यानंच आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना टार्गेट करण्यात आला आहे, असा युक्तीवाद पूजा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. तसंच पूजा खेडकर या 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

राजीव कासले | Updated: Aug 2, 2024, 10:39 AM IST
'पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर, जिल्हाधिकाऱ्यांनीच तिला रुममध्ये बोलावलं आणि...' प्रकरणात नवा ट्विस्ट title=

Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.  पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामिनावर पटियाला हाऊस कोर्टात (Patiala House Court) सुनावणी सुरू असताना पूजाच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (Pune Collector) पूजा खेडकर यांचा लैंगिक छळाचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. . दरम्यान सरकारी वकिलांनी चौकशीसाठी पूजा खेडकरांच्या कोठडीची मागणी केलीय. आता उद्या दुपारी 4 वाजता याप्रकरणी पटियाला हाऊस कोर्ट निकाल देणारेय. 

पूजा खेडकर यांच्या वकिलांचा युक्तीवाद
पूजा खेडकर यांच्या बाजूने अॅडव्होकेट बिना माधवन यांनी युक्तीवाद केला. माधवन यांनी खेडकर यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत कोर्टाला माहिती दिली. पूजा खेडकर या आता प्रोबेशनरी ऑफिसर्स आहेत
त्यांना त्यांचे काही अधिकार आहेत, पूजाला अटक होण्याचा धोका आहे असं माधवन यांनी कोर्टात सांगितलं. मेडीकल बोर्डने म्हटलं आहे की पूजा एकापेक्षा जास्त अपंगत्व असलेली उमेदवार आहे आणि तिला कायमस्वरूपी बेंचमार्क अपंगत्व आहे. टक्केवारी तिच्या संपूर्ण शरीराच्या संबंधात 47 टक्के आहे, असा युक्तीवाद माधवन यांनी केला.  दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय लोकांच्या समान आहेत आणि त्यामुळे त्यांना समान लाभ मिळण्यास पात्र आहेत. पूजाने एकूण प्रयत्नाी संख्या देण्यात चूक केली, पूजाने पाच प्रयत्न केले, पण UPSC म्हणतं की 12 वेळा प्रयत्न करण्यात आले. यूपीएससी या प्रकरणाची चौकशी करु शकते, असंही माधवन यांनी म्हटंलय.

आता मोठी बातमी - पूजा खेडकर नक्की आहे तरी कुठे? परदेशात पसार झाल्याच्या चर्चांना उधाण

दिल्ली पोलिसांनी आपल्या जबाबात चौकशीसाठी पूजा खेडकर यांच्या कोठडीची मागणी केलीय. पण पूजा खेडकर यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांना वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावले आहे. 

लैंगिक छळाची तक्रार केल्याने कारस्थान
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार केल्याने आपल्या विरोधात कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला आहे.  सुहास दिवसे यांनी पूजाला त्यांच्या खोलीत बोलावलं होतं, मात्र, पूजा खेडकर यांनी त्याला नकार दिला, असा दावा ॲडव्होकेट माधवन यांनी केला. पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग आहे आणि तिचे आई-वडील घटस्फोटित आहेत. तिच्यावर गुन्हा का दाखल केला गेला. कारण ती दिव्यांग आहे म्हणून की ती महिला आहे म्हणून?,असे सवाल खेडकर यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर उपस्थित केले.

महत्त्वाची बातमी - आताची मोठी बातमी! पूजा खेडकरला अटक होणार? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

खेडकर कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड
दरम्यान,  पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झालाय. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी इथं असलेल्या 14 गुंठे जमिनीच्या सातबारातील आपल्या नावातील वडिलांचं नाव बदललंय. दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केलाय. दिलीप कोंडीबा खेडकर यांनी 14 वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केलीय. त्याचा सातबारा ही उपलब्ध आहे. वाघळवाडी इथं दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचं पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केले होतं. ही जमीन विक्री करायची असल्यानं त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा बोर्ड लावलाय. दीड कोटी जमिनीची किंमत असल्याचं सांगितलं जातंय. आता सातबारावर नव्यानं कोंडिबा केलंय.