अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईत पसार? आणखी एक नवा कारनामा उघड

Pooja Khedkar : दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईत पसार झाल्याचा संशय आहे. या दरम्यान पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकरने नावात 12 वेळा फेरफार केल्याचं उघड झालंय.

राजीव कासले | Updated: Aug 2, 2024, 04:14 PM IST
अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईत पसार? आणखी एक नवा कारनामा उघड title=

Pooja Khedkar : पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं (Patiyala House Court) हा निर्णय दिला. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिला अटक होऊ शकते. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएएस दर्जा मिळवल्याप्रकरणी पूजा खेडकर विरोधात फ्रॉडचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. पूजाचा IAS दर्जाच रद्द करण्याचा निर्णय UPSCनं काल घेतला. तर पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय. एवढंच नव्हे तर ओबीसी आणि अपंगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आणखी कुणी सवलती लाटल्यात, याची चौकशी करण्याचे आदेशही न्या. देवेंद्र कुमार जंगाला यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला दिलेत.

पूजा खेडकर दुबईला पसार
यादरम्यान, पूजा खेडकरनं दुबईत पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. एका वृत्तपत्रानं यासंदर्भात दावा केलाय. केंद्रीय लोकसेवा आयोगापाठोपाठ दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टान दणका दिल्यानंतर पूजा खेडकर दुबईत गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएएस दर्जा मिळवल्याचा ठपका तिच्यावर आहे. गेल्या 10 दिवसांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल आहे. मसुरीच्या IAS प्रशिक्षण संस्थेनं तिला परत बोलावलं. मात्र ती हजर झालेली नाही. वाशिममधून निघालेली पूजा खेडकर नक्की कुठं आहेत, याचा ठावठिकाणा लागत नाहीय. कोर्टानंही तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. आता पूजा खेडकर दुबईत पसार झाल्याचा एका वृत्तपत्राने दावा केलाय.

हे ही वाचा : 'पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर, जिल्हाधिकाऱ्यांनीच तिला रुममध्ये बोलावलं आणि...' प्रकरणात नवा ट्विस्ट

आणखी एक कारनामा उघड

पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकरने तब्बल 12 वेळा स्वत:च्या नावात फेरफार करून परीक्षा दिल्याचं तपासात निष्पन्न झालंय. IAS होण्यासाठी पुजा खेडकर आणि तिच्या आई-वडिलांनी वेगवेगळी नावं धारण केल्याचं य़ुपीएससीच्या चौकशीत समोर आलंय. पुजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना दिल्ली पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिलीय. इंग्रजी भाषेतून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचं स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता समोर आलंय. पूजाने स्वतःचं पूर्ण नाव लिहिताना 12 वेळा फेरफार केल्याचं उघड झालंय. इतकंच नव्हे तर पूजा खेडकरने तिच्या वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.