बाळासाहेब मी तुम्हाला त्रास दिला - नारायण राणे
बाळासाहेब मला माफ करा. मी खूप त्रास तुम्हाला त्रास दिला आहे, असे पश्चातापाचे उद्गार माजी शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी काढले.
Nov 17, 2012, 10:44 PM ISTबाळासाहेबांच्या निधनाच्या वृत्तानंतर मुंबई बंद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजतात काही मिनिटात मुंबईतील सर्व व्यवहार बंद झालेत. परळ, दादर, लालबाग, माहिम, गिरगाव अशा मराठीवस्तीच्या भागात शोकाकूळ वातावण होते. येथील वेगाने विविध दुकाने, मॉल्स, बाजार बंद झाले. दरम्यान, सावधगिरीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी मुंबईभरात कडक बंदोबस्त ठेवला होता.
Nov 17, 2012, 07:42 PM ISTप्रवाहाला छेद देणारा ‘एकटा टायगर’ गेला!
अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, समाजाच्या दांभिकपणावर प्रहार करणाऱ्या आणि प्रबोधनातून समाजकल्याण हे एकमेव ध्येय असणाऱ्या प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांनी नुसताच समर्थपणे पेलला नाही, तर प्रबोधनकारांचा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात रुजवला.
Nov 17, 2012, 05:50 PM ISTबाळासाहेब लवकरच मार्गदर्शन करतील- रामदास कदम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब लवकरच तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील असा विश्वास शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यकत केला.
Nov 17, 2012, 10:49 AM ISTमियाँदाद यांनी मागितली बाळासाहेबांसाठी दुवाँ!
पाकिस्तानचे क्रिकेटर जावेद मियाँदाद यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती बरी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या आहे. त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून आपण अल्लाकडे दुवा मागितली असल्याचं मियाँदाद यांनी सांगितले.
Nov 16, 2012, 07:55 PM ISTअन् शिवसेना भवन पुन्हा उजळले...
बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याने शिवसेना भवन येथे करण्यात आलेली विद्युत रोषणाई पुन्हा सुरू करण्यात आली. बाळासाहेबांची प्रकृती बिघडल्याने ही विद्युत रोषणाई बंद करण्यात आली होती.
Nov 16, 2012, 09:39 AM ISTशाहरुखने मागितली बाळासाहेबांसाठी दुवा
अभिनेता शाहरुख खानही रात्री उशिरा ‘मातोश्री’वर दाखल झाला. बाळासाहेबांच्या उदंड आयुष्यासाठी मी परमेश्वाराकडे प्रार्थना करतो. दुवा मागतोय. हे युद्ध ते नक्कीच जिंकतील आणि त्यांच्या प्रकृतीला आराम मिळेल असा मला विश्वा स आहे, अशा भावना त्याने ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
Nov 16, 2012, 08:14 AM ISTदेशाला बाळासाहेबांची गरज - अण्णा
‘या देशाला बाळासाहेबांची गरज आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतोय’ अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिलीय.
Nov 15, 2012, 11:00 PM ISTबाळासाहेबांची प्रकृती स्थिर – राज ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या आणि होमहवन सुरू आहेत. याचदरम्यान, पुतणे राज ठाकरे यांनी चागंली बातमी दिली, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे.
Nov 15, 2012, 03:41 PM ISTसाहेब, बरे व्हा... महाआरत्या, होमहवन
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या आणि होमहवन सुरू आहेत. प्रार्थना एकच बाळासाहेब यांना आजारातून बाहेर काढ.
Nov 15, 2012, 02:38 PM ISTशिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीच्या बातम्या पाकिस्तानतही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीच्या बातम्यांनी फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांचीही पानं भरली आहेत. इतर वेळी केवळ मुंबईचे आणि महाराष्ट्रातील एक पक्ष संस्थापक मालने गेलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची बातमी बीबीसी सारख्या अव्वल वृत्तवाहिनीनेही दिली आहे.
Nov 15, 2012, 02:33 PM ISTबाळासाहेबांशी काय बोलावं सुचलंच नाही, शरद पवार भावूक
केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्यातील मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. शरद पवार हे भेटीसाठी `मातोश्री`वर गेले होते.
Nov 15, 2012, 02:29 PM ISTबाळासाहेबांच्या आठवणीने मनोहर जोशी गहिवरले...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृती गंभीर असल्याने शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह इतरही नेत्यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती.
Nov 15, 2012, 12:35 PM ISTबाळासाहेबांच्या प्रकृतीमुळे मी खूप अस्वस्थ - लता मंगेशकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची मला खूप काळजी वाटते आहे, त्यांची मला खूप काळजी वाटत असल्याचे गानकोकीळा लता मंगेशकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
Nov 15, 2012, 12:35 PM ISTमुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट
काल सायंकाळपासून एकच नाव ऐकायला मिळत होते ते बाळासाहेब यांचे. त्यांची कशी आहे प्रकृती? त्यांच्यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करीत आहे. त्याच दरम्यान, मुंबईची गतीही एकदम संत झाली. रात्री दहानंतर मुंबई कासव गतीने धावत होती. ही गती सकाळी जवळपास बंदच झाली. मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. तर दुकानेही उत्स्फुर्त बंद ठेवण्यात आली आहेत.
Nov 15, 2012, 12:29 PM IST