उद्धव ठाकरे यांना सेनाप्रमुखांचे अधिकार
शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेत. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Dec 2, 2012, 03:19 PM ISTशिवसेनाप्रमुख बाळासाहेबच कायम - उद्धव ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची शब्दापलीकडील नात्याची वीण त्यांच्या निधनानंतरही घट्ट असल्याने त्यांच्या पश्चातही शिवसेनाप्रमुख या पदावर बाळासाहेबच कायम राहणार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
लाखो शिवसैनिकांची भावना लक्षात घेता आपण त्यांची जागा घेणार नाही. कार्यकारी अध्यक्षपदावरच राहू. पुढील घोडदौड सुरू ठेवण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख होणार तरी कोण?
हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे अशी ओळख असणारे बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी रोवलेल्या बीजाचा आता वटवृक्ष झाला आहे.
Dec 1, 2012, 05:15 PM ISTउद्धव ठाकरे करणार महाराष्ट्राचा दौरा
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे येत्या 3 डिसेंबरपासून राज्याच्या दौ-यावर निघणार आहेत. पंधरा दिवस ते राज्यभर फिरणार आहेत.
Nov 30, 2012, 06:28 PM ISTफेसबुक पोस्टच्या वादात मुख्यमंत्र्यांचीही उडी...
पालघर फेसबूक प्रकरणात करण्यात आलेलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
Nov 28, 2012, 03:43 PM ISTठाकरे कुटुंबाने एकत्र येणाचे अडवाणींचे आवाहन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर तरी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का, ही चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही नेमक्या याच विषयाला हात घातलाय. ठाकरे कुटुंबाने एकत्र यावे असं आवाहन अडवाणी यांनी केलंय.
Nov 28, 2012, 12:31 PM ISTबाळासाहेबांच्या आठवणींना सर्वपक्षीय उजाळा...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. सर्व राजकीय पक्षांच्यावतीनं ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
Nov 28, 2012, 10:00 AM ISTबाळासाहेब ठाकरेंचं मंदिर उभारणार
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मारक होणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह असलं तरी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मात्र बाळासाहेबांचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतलाय.
Nov 26, 2012, 12:25 AM ISTबाळासाहेबांचं स्मारक मुंबई महापौर बंगल्याशेजारी?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक दादरच्या महापौर बंगल्याशेजारी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेतल्या सर्वपक्षिय नेत्यांच्या समितीनं तयार केलाय. महापौर बंगल्याशेजारी एका क्लबला भाडेपट्टीवर दिलेली जागा आहे. ही लीज संपलेली असल्यानं त्या जागेत बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाऊ शकतं.
Nov 25, 2012, 03:08 PM ISTसंसदेत बाळासाहेबांना श्रद्धांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहाने श्रद्धांजली वाहिण्यात आली. आजपासून हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.
Nov 22, 2012, 01:42 PM ISTउद्धव यांच्या हातीच सेनेची धुरा- जोशी सर
बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेचे संपूर्ण काम आता उद्धव ठाकरे हातात घेतील असा विश्वास शिवसेना नेते मनोहर जोशींनी व्यक्त केलाय. उद्धव ठाकरे पक्षकामात स्वतःला झोकून पक्ष वाढवतील, पक्ष पुढे नेतील असंही मनोहर जोशींनी सांगितलं.
Nov 19, 2012, 07:26 PM ISTअस्थिकलश घेतांना उद्धव यांना झाले अश्रू अनावर
बाळासाहेबांच्या अस्थीकलशासाठी ठाकरे कुटुंबीय शिवाजीपार्कवर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेतेही उपस्थित होते.. आजही उद्धव ठाकरेंना अश्रू अनावर झाले
Nov 19, 2012, 06:28 PM IST….आणि महाराष्ट्र ढसाढसा रडला
बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा, उपचारांना साहेबांचा चांगला प्रतिसाद, शिवसैनिकांच्या प्रार्थनेला यश, सेनाप्रमुखांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देवाला साकडं....अशा अनेक बातम्यांनी उभा महाराष्ट्र काल, परवापर्यंत किंबहूना आज दुपारपर्यंत ढवळून निघाला होता. पण शेवटी ती दुदैवी बातमी आलीच आणि उभ्या महाराष्ट्राच्या अश्रूंचा बांध फुटला..
Nov 18, 2012, 03:50 PM ISTशिवतीर्थावरच अखेरचा निरोप
बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शनिवारी दुपारी ३.३३ वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या राजकारणात गेली पाच दशके घोंगावणारे वादळ शांत झाले. आज रविवारी बाळासाहेबांना शिवतीर्थावरच सायंकाळी ५ वाजता अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
Nov 18, 2012, 07:43 AM ISTबाळासाहेब आणि मीनाताई
१४ जून १९४८ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सरला वैद्य यांच्याशी विवाह केला आणि सरला वैद्य मीना ठाकरे म्हणून बाळासाहेबांच्या संसारात आल्या. शिवसेनेतील तमाम शिवसैनिकांसाठी भविष्यात त्या मीनाताई बनल्या.
Nov 18, 2012, 12:35 AM IST