मध्य

पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही

पश्चिम रेल्वेवर आज सांताक्रूझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत हा जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक अप आणि डाऊन अशा दोन्ही स्लो मार्गांवर असणार आहे. त्यामुळे सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांमध्ये अप आणि डाऊन स्लो मार्गांवरील गाड्या फास्ट मार्गांवरून चालवण्यात येणार आहेत. तसंच सर्व स्लो लोकलना विलेपार्ले स्थानकातील फास्ट मार्गावरील प्लॅटफॉर्म क्र. ५ आ​णि ६ वर विशेष थांबा देण्यात येणार आहे.

Sep 3, 2017, 10:36 AM IST

मुंबईत रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

गणेशोत्सवाच्या तिस-या दिवशी रेल्वेने आज मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी सव्वा अकरा ते सध्याकाळी सव्वाचारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Aug 27, 2017, 10:07 AM IST

मध्य आणि हार्बर मार्गावर ११ ते ४.३० पर्यंत मेगाब्लॉक

मध्य, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड धीमा मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे आणि चुनाभट्टी-वांद्रे ते सीएसएमटी मार्गावर ब्लॉक असेल.

Jul 23, 2017, 08:49 AM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमध्ये तांत्रिक दोष दूर करणे रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.

May 28, 2017, 07:49 AM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी सव्वा चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या काळात ही वाहतूक अपधिम्या मार्गावर वळवण्यात येईल. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.

May 14, 2017, 09:09 AM IST

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर ११ ते ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Apr 2, 2017, 08:26 AM IST

मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Feb 11, 2017, 10:30 AM IST

हार्बर मार्गावर 13 नव्या लोकल ट्रेन

हार्बर मार्गावर आता लवकरच नव्या 13 लोकल ट्रेन धावणार आहेत. 

Nov 24, 2016, 08:32 AM IST

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Nov 13, 2016, 07:32 AM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय.

Jan 25, 2016, 09:01 PM IST

मुंबईत पावसाचा जोर, मध्य-हार्बर लेट, ट्रॅफिक जॅम

 मुंबई आणि उपनगराला आज सकाळपासून जोरदार पावसाने झोडपले असून सततच्या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे उशिराने धावत असून ठिकठिकाणी तुंबलेल्या पावसाच्या पाण्यामुळे ट्रॅफिक जॅम झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. 

Jul 31, 2014, 12:20 PM IST

पश्चिम रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉक

आज तुमचा कुठे फिरायला जायचा बेत असेल आणि रेल्वेने प्रवास करण्याचा मानस असेल तर जरा थांबा... कारण आज मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक राहणार आहे.

Jun 3, 2012, 10:08 AM IST

लाईफलाईनला पर्याय काय?

मुंबईच्या लाईफलाईनला पर्याय म्हणून जलवाहतुकीकडं बघीतलं जातयं. मुंबई आणि उपनगरांना समुद्र किनारा लाभल्यामुळं या पर्यायवर विचार केला गेलाय. या योजनेसाठी राज्य सरकारने प्रस्तावही तयार केला होता. मात्र इतर योजनांप्रमाणेच ही योजनाही सध्या लालफितीत अडकलीय.

Apr 19, 2012, 11:59 PM IST