मुंबई : मुंबई आणि उपनगराला आज सकाळपासून जोरदार पावसाने झोडपले असून सततच्या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे उशिराने धावत असून ठिकठिकाणी तुंबलेल्या पावसाच्या पाण्यामुळे ट्रॅफिक जॅम झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. जीटीबी नगर-वडाळा दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील गाड्या १० मिनिटं उशिराने धावत आहे. तर मध्य रेल्वेची वाहतूकही ३० ते ३५ मिनिटं उशिराने सुरु आहे. मात्र पश्चिम रेल्वेमार्गावरची वाहतूक सुरळीत आहे. काल रात्री सँडस्टहर्स्ट स्टेशन जवळ झाड़ाची फांदी वाकल्याने हार्बरची डाउन दिशेची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे रेल्वेने विशेष मेगा ब्लॉक घेतला.
जोरदार पावसामुळे मेट्रोचाही वेग मंदावला आहे. त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा दरम्यानच्या मेट्रोने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.