24 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको करा, मनोज जरांगेचं मराठा समाजाला आवाहन, 'पोलिसांनी कारवाई केली तर...'
Maratha Protest: मराठा आऱक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 24 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे, दरम्यान कुणाचीही गाडी फोडू नका, जाळू नका पण पुढे जाऊ देऊ नका असंही ते म्हणाले आहेत.
'सगेसोयऱ्यांची 2 दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा...', मनोज जरांगे पाटलांचा इशारा
Maratha Reservation: आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात नेमकी अडचण काय आहे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली आहे. तसंच 24 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजता रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे.