महायुती

'महायुती म्हणूनच लढणार' फडणवीस यांचा खुलासा

शिवसेनेसोबत युती नको अशी भावना अनेक पदाधिका-यांनी या बैठकीत व्यक्त केली. मात्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणूनच लढणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्व २८८ मतदारसंघांमध्ये काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Jul 3, 2014, 07:38 PM IST

महायुतीतील नेत्यांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री ठरणार - उद्धव

शिवसेनेचा आज वर्धापन दिन कार्य़क्रम झाला. यानिमित्त दोन दिवसीय शिबीराचं आयोजन केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिबीरामध्ये मांडलेलं व्हिजन सांगितलं. महायुतीचं सरकार आल्यावर मुंबईसाठी काय करणार याबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.

Jun 19, 2014, 08:03 PM IST

‘एटीएम’ भंगलं… महायुतीसमोर राज ठाकरेंचं आव्हान!

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा फॉम्युर्ला गोपीनाथ मुंडेंनी यशस्वी करुन दाखवला. मुंडेंच्या अकाली निधनानं आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्रालयावर भगवा कसा फडकवायचा? असा प्रश्न फक्त भाजपलाच नव्हे, तर महायुतीला पडलाय.

Jun 6, 2014, 10:51 AM IST

`महायुतीला राज्यात ३४ जागा मिळतील`

महायुतीला राज्यात ३४ पेक्षा जास्त जागा मिळतील, असं भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच आपण भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे आदेशही दिले असल्याचं मुंडेंनी म्हटलंय.

May 14, 2014, 04:35 PM IST

मुंबई कुणाची? महायुती आघाडीला सुरूंग लावणार?

मुंबई कुणाची? याचा फैसला गुरूवारी होणाराय... मुंबईतील सहा मतदारसंघात उद्या गुरुवारी मतदान होतंय. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने या सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या. आघाडी यंदाही ती किमया कायम राखणार की, महायुती आघाडीला सुरूंग लावणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.

Apr 22, 2014, 10:44 PM IST

राहुल गांधी गरिबीची थट्टा करतात, मोदींचा हल्लाबोल

बीकेसीमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी माँ-बेटेकी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. या सरकारमध्ये कुठलंही उत्तर देण्याची हिंमत नाही, हे फक्त गरिबीची थट्टा करतात आणि राहुल गांधी गरिबीचं टुरिझम करतात, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि भाषणात सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.

Apr 21, 2014, 09:29 PM IST

`उद्धट` लोकांसाठी मी ही उद्धट, उद्धव ठाकरेंचं पवारांना प्रत्युत्तर

मुंबईत आज महायुतीची सभा झाली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि सरकारवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रातील जनता नरेंद्र मोदींना निराश करणार नाही. आम्ही निवडणुकीसाठी ढाणे वाघ रिंगणात उतरवले आहेत. ते कुठंही कमी पडणार नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विजयाचा विश्वास बोलून दाखवला.

Apr 21, 2014, 09:11 PM IST

भुजबळांना धक्का; सिन्नरच्या `वाघा`चा महायुतीला पाठिंबा

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना महिनाभरात  तिसरा धक्का बसलाय. काँग्रेसचे सिन्नर पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांनी महायुतीच्या उमेदवारांला पाठिंबा दिलाय.

Apr 11, 2014, 10:46 AM IST

महायुतीचा अपेक्षाभंग होऊ शकतो का?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर असतानाच राज्यातील आघाडी आणि महायुती यांच्यात कडवी झुंज दिसुन येत आहे.

Apr 8, 2014, 01:29 PM IST

युतीसाठी एक फोन करायचा होता - राज ठाकरे

महायुतीत मनसेला घ्यायचंच होतं, तर हा बाहेर किंवा वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेलवर चर्चा करण्याचा विषय नव्हता, असं स्पष्ट करत मला जर एक फोन केला असता तर मी चर्चा करण्यासाठी तयार झालो असतो, असे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पुण्यातील पहिल्या जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट केली. मनसेनं आपला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. माझी अवकात काढलीत ना तर आता मी या निवडणुकीत अवकात दाखवून देईन, असे राज म्हणालेत.

Apr 1, 2014, 10:04 AM IST