माफी

शाही निषेध...दूध अभिषेक आणि मुश्रीफ यांची जाहीर माफी

कामगारमंत्री आणि बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काल राष्ट्रवादीच्या अपंगांच्या सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेनं शाई फेकल्यानंतर आज हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरमध्ये दुग्धाभिषेक घालण्यात आला. हसन मुश्रीफ यांनी झालेल्या प्रकाराबद्दल झी 24 तासकडे महाराष्ट्राची जाहीर माफी मागितलीय.

Dec 27, 2013, 12:33 PM IST

माफी मागण्याचा प्रश्नच नाही - नितेश राणे

आपण कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही. त्यामुळे कुणाची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंनी गुजराती समाजाचा इशारा धुडकावून लावला आहे.

Sep 7, 2013, 01:54 PM IST

`राणे बिनशर्त जाहीर माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा`

उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि गुजरात समाजातला तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नितेश राणेंनी मुंबईतील गुजराती समाजाबद्दल केलेल्या विधानांसंदर्भात बिनशर्त जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा गुजराती समाजानं दिलाय.

Sep 7, 2013, 10:03 AM IST

काय हरकत आहे... `माफ कर` म्हणायला!

नातेसंबंधात तणाव किंवा गैरसमजूतींना थारा मिळाला तर नात्याचा पायाच डगमगायला लागतो. हेच नात्याचे बंध मजबूत असतील तर कितीही तणावात असलं तरी आणि कितीही गैरसमजुतींचा अडथळा समोर आला तरी हे बंध कायम राहतात.

Jul 2, 2013, 08:00 AM IST

अजित पवारांची गांधीगिरी, कराडमध्ये आत्मक्लेश

वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. सामाजिक जीवनात जे काही घडलं त्याच प्रायश्चित घेण्यासाठी आपण येथे आलोय, असं सांगत अजित पवार कराडमध्ये दाखल झाले आहेत.

Apr 14, 2013, 09:58 AM IST

चूक अजितदादांची, माफी मागावी पृथ्वीराजांनी?

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आतापर्यंत ४ वेळा माफी मागूनही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

Apr 9, 2013, 04:50 PM IST

माझी चूक झाली, मला माफ करा - अजित पवार

बेताल वक्तव्य करून दुष्काळग्रस्तांची थट्टा करणा-या अजित पवार यांना मीडियामुळे अखेर नमतं घ्याव लागलं. `झी २४ तास`ने बातमी लावून धरली होती. तर `२४तास डॉट कॉम`ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. या बातमीच्या दणक्यानंतर चौथ्यांदा अजित पवार यांनी माफी मागितली. माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक असल्याची कबुली त्यांनी दिली.

Apr 8, 2013, 06:58 PM IST

भगव्या दहशतवादाचा ड्रामा, केंद्रीय गृहमंत्र्यांनी मागितली क्षमा!

जयपूरमधील काँग्रेस अधिवेशनात भगव्या दहशतवादाबाबत केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अखेर माफी मागीतली आहे. माझ्या वक्त्यव्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो असे शिंदेंनी बुधवारी संध्याकाळी जाहीर केलं.

Feb 20, 2013, 09:37 PM IST