मुंबई गोवा महामार्ग

मुंबई-गोवा चौपदरीकरण दोन वर्षांत : गडकरी

मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम येत्या २ वर्षांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल, असा ठाम निर्धार केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

Jun 4, 2015, 09:15 AM IST

कणकवलीत आंदोलक-पोलीस आमनेसामने, नितेश राणे यांना अटक

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे भात शासनाने खरेदी न केल्याने काँग्रेस आमदार नितेश राणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आज शेतकरी आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडत गोडावूनकडे धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आलेत. तर आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे कणकवलीत तणावाचे वातावरण होते.

May 27, 2015, 01:57 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर टोल होणार लागू

मुंबई-गोवा हाय-वेवर टोल लागू होणार आहे. या हायवेचं चौपदरीकरणानंतर हा टोल लागू करण्यात येणार आहे. 

May 22, 2015, 05:53 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर टँकर स्फोटात एक ठार, वायुगळतीने भीती

 मुंबई-गोवा हायवेवर खेडजवळ भोस्ते घाटामध्ये एक केमिकलचा टँकर पलटी होऊन त्याचा प्रचंड स्फोट झाला. टँकर दरीत कोसळल्यानंतर बराच वेळ स्फोट होत होते. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी अद्याप टँकरमधून गॅसगळती सुरूच आहे. त्यामुळे प्रसंगी आसपासच्या परिसरातून लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

Aug 30, 2014, 08:34 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावर एसटी अपघात, १ ठार १५ जखमी

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. आज बुधवारी सकाळी चिपळूणजवळ वालोपे येथे मुंबई - गोवा महामार्गावर एसटी दरीत कोसळून १ ठार तर १५ जण जखमी झालेत. बोरिवलीहून साखरपा येथे जाणा-या एसटी बसला भीषण अपघात झाला.

Aug 27, 2014, 10:29 AM IST

मुंबई-गोवा मार्गावरील अपघातात ३५ जण जखमी,१६ गंभीर

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झालेल्या धडकेत ३५ जण जखमी झालेत. त्यामधील १६ जण गंभीर आहेत. सकाळी पावणे पाचला हा अपघात झालाय.

Feb 11, 2014, 10:02 AM IST

सावंतवाडीतील कार अपघातात ५ ठार, दोन जखमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील मळगाव येथे झालेल्या भीषण कार अपघातात पाच जण ठार झाले. कारचा टायर फुटल्याने ती दरीत कोसळली. या अपघातात बालकांसह पाच जण ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत.

Dec 21, 2013, 11:21 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी गणेश उत्सवाच्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे या मार्गावर जड वाहने चालवू नये, असे आवाहन वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

Sep 6, 2013, 03:49 PM IST