राम रहिम

डेऱ्यात सापडला महिला शिष्यांच्या हॉस्टेलकडे जाणारा गुप्त रस्ता

हरियाणामधल्या सिरसा येथील गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाची लष्कर आणि हरियाणा पोलिसांकडून तिस-या दिवशीही झाडाझडती सुरु झाली आहे.

Sep 10, 2017, 11:33 AM IST

खुलासा! सिनेमे हिट करण्यासाठी राम रहीम हनीप्रीतसोबत करायचा हे काम!

बलात्कारप्रकरणी शिक्षा झालेला राम रहीमबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गुरमीतचा ड्रायव्हर आणि साक्षीदार खट्टा सिंह याने राम रहीमची पोलखोल केली आहे. खट्टा सिंहने राम रहीमच्या सिनेमांबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

Sep 5, 2017, 04:09 PM IST

आरोपी बाबा राम रहिमच्या मानलेल्या मुलीचे खरे नाव

 बलात्कार प्रकरणी आरोपात दोषी डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहिमला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  

Aug 29, 2017, 11:08 AM IST

'मीच ईश्वर आहे सांगत माझ्यावर बलात्कार'

डेरा सच्चा सौदा आश्रमात राहणाऱ्या एका साध्वीचे पत्र समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Aug 29, 2017, 10:29 AM IST

राम रहिम यांना शिक्षेनंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणी राम रहिमला सीबीआय कोर्टाने १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हरियाणा सरकारने राज्यात सुरक्षा व्यवस्थेची स्थिती जाणून घेण्यासाठी आपात्कालीन बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर या बैठकीचं नेतृत्व करणार आहेत. या बैठकीत राज्यात हिंसा पसरु नये म्हणून योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबाबत चर्चा करुन योग्य ते आदेश दिले जाणार आहेत.

Aug 28, 2017, 05:19 PM IST

राम रहिमनंतर कोण होणार डेरा प्रमुख

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने साध्वीच्या बलात्काराखाली आरोपी राम रहीमला दोषी ठरवलं आहे. यानंतकर आज त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. राम रहीमकडे कोटींची संपत्ती होती. एका रिपोर्टनुसार त्याच्याकडे सिरसामध्ये ७०० एकरवर शेत, २५० आश्रम, आय बँक, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. त्याची एक दिवसाची कमाई १६ लाख रुपये आहे. आता जर राम रहिमला शिक्षा झाली तर त्याच्या जागी त्याचा उत्तराधिकारी कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

Aug 28, 2017, 02:57 PM IST

बापरे! इतकी आहे राम रहिमची एका दिवसाची कमाई

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने साध्वीच्या बलात्काराखाली आरोपी राम रहीमला दोषी ठरवलं आहे. यानंतकर आज त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Aug 28, 2017, 01:51 PM IST

राम रहिमच्या 'त्या' गुंडांना बघताच गोळ्या घालण्याचे आदेश

बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेला बाबा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. रोहतक जेलमध्ये बंद असलेल्या राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या द्वारे पंचकूलाच्या सीबीआई कोर्टात हजर केलं जाणार आहे. रोहतक जेलच्या परिसरात कोणताही अपरिचित व्यक्ती दिसताच गोळ्या गालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता कडक पाऊलं उचलली आहेत. सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये भारतीय जवानांच्या २८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Aug 28, 2017, 10:07 AM IST

पंजाब-हरियाणात हिंसा पसरवण्यासाठी भाडोत्री गुंड?

गुरमीत बाबा राम रहिमवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता.

Aug 27, 2017, 10:15 PM IST

अखेर राम रहिम हिंसा प्रकरणावर बोलले पंतप्रधान मोदी

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याच्या अटकेनंतर सध्या पंजाब, हरियाणासह रामरहीमचे समर्थक असलेल्या भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सीबीआय कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर हजारोंच्या संख्येत जमलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारात मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. यात ३६ जणांचा बळी गेलाय तर २५० हून अधिक जण जखमी झाले.

Aug 27, 2017, 11:34 AM IST