अण्णा राळेगणसिद्धीकडे रवाना
तीन दिवस उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुसऱ्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतले. दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले.
Dec 29, 2011, 02:12 PM ISTअण्णा राळेगणसिद्धीत दाखल
दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले. ते दुपारी राळेगणसिद्धीत दाखल झालेत. अण्णा तीन दिवस विश्रांती घेणार आहेत. अण्णांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Dec 29, 2011, 02:09 PM ISTलोकपाल बिलावर राज्यसभेत घमासान
लोकपाल बिलावर आज राज्यसभेत घमासान चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेतल्या नामुष्कीनंतर काँग्रेसचे जुळवा-जुळवीचे प्रयत्न सुरू आहेत. एसपी-बीएसपीच्या हातात सरकारची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे लोकपाल बिलाचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
Dec 29, 2011, 11:23 AM ISTलोकपाल घटनात्मकतेचे खापर भाजपावर
सरकारी लोकपाल विधेयक मंगळवारी रात्रा लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर आज जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचे त्या म्हणाल्या.
Dec 28, 2011, 02:37 PM ISTवणवा पेट घेत आहे.....
मुंबईत अण्णांचं आंदोलन सुरु असताना राज्यभरात लोकपालसाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. अण्णांचं गावं राळेगणसिद्धीसह पुणे, नाशिक, नागपूर आणि नांदेडमध्ये लोकपालसाठी आंदोलन करण्यात आलं.
Dec 27, 2011, 10:37 PM IST'लोकपाल' बिल आज तरी पास होणार का?
गेले अनेक दिवस चर्चेचा ठरलेला लोकपाल बिल आज संसदेत चर्चेला येणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात या लोकपाल बिलाविषयी कमालीची उत्सुकता आहे. मागील काही दिवसांपासून सरकार आणि टीम अण्णा यांच्यामध्ये लोकपालच्या मसुद्यावरून मतभेद सुरू आहेत.
Dec 22, 2011, 04:35 AM ISTलोकपालचं काय होणार?
लोकपलाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलय. या बैठकीपूर्वी रात्री युपीच्या घटक पक्षांशी बैठक पार पडली. या बैठकीत लोकपालबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
Dec 14, 2011, 06:00 AM ISTलोकपालबाबत केंद्रसरकार ताठर
लोकपाल विधेयकाबाबत केंद्र सरकारनं ताठर भूमिका घेतलीय. कोणत्याही मागण्या मान्य करायला सरकार बांधिल नसल्याचं सरकारच्यावतीनं स्पष्ट केलयं.
Dec 13, 2011, 10:18 AM ISTकेंद्र सरकारवर अण्णांची लोकपाल तोफ
केंद्र सरकारचा ड्राफ्ट आम्हांला मंजूर नाही. सक्षम लोकपाल बिल येत नाही तोपर्यंत यांच्याविरोधी आवाज उठवणारच आहे, असा ईशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
Dec 10, 2011, 02:35 PM ISTलोकपालचं घोड उद्या संसदेत...
लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा नऊ डिसेंबरला म्हणजेच शुक्रवारी संसदेत मांडण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Dec 8, 2011, 04:47 AM ISTराणेंच्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर भाजप तसंच एनजीओकडून सुपारी घेतल्याच्या नारायण राणेंनी केलेल्या आरोपाचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी समर्थन केलंय. काँग्रेसला विरोध आणि एका 'विशिष्ट पक्षाला फायदा' असं अण्णा वागत असल्याचा दावा केलाय.
Dec 5, 2011, 02:50 AM ISTलोकपालच्या बाहेर 'क्लास' थ्री
लोकपाल बिलच्या ड्राफ्टमधून अखेर क्लास थ्री कर्मचा-यांना बाहेर ठेवण्याचाच निर्णय संसदेच्या स्थायी समितीने घेतलाय. तर लोकपालच्या कक्षेत सर्व कर्मचारी आणि पंतप्रधान यायला हवेत, असं पुण्यात अण्णा हजारेंनी स्पष्ट केलय.
Dec 2, 2011, 11:49 AM ISTराणेंचा अण्णांवर 'प्रहार'
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी थेट अण्णा हजारे यांना लक्ष बनवत हल्लाबोल केला आहे. राणेंच्या 'प्रहारा'वर अण्णा काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
Dec 2, 2011, 08:48 AM ISTलोकपाल बिलाचा मसुदा तयार
लोकपाल बिलाचा मसुदा स्थायी समितीनं तयार केला आहे. लोकपालच्या कार्यकक्षेत पंतप्रधानांचा समावेश करण्यात आलेला नाही. ही माहिती सूत्रांनी दिली. न्यायपालिका आणि खासदारांचं संसदेतील वर्तनही लोकपालच्या कक्षेतून वगळण्यात आलं आहे.
Nov 28, 2011, 05:49 PM ISTअण्णा फॅसिस्ट - डॉ. भालचंद्र मुणगेकर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मी म्हणेल तोच कायदा ही भूमिका अयोग्य असल्याचं मत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी व्यक्त केलं आहे.
Nov 27, 2011, 06:28 AM IST